लेटेस्ट Apple iPhone 15 वर आतापर्यंतची सर्वात मोठी डील ऑफर केली जात आहे. या डील अंतर्गत तुम्ही iPhone 15 फक्त 37,990 रुपयांना खरेदी करू शकता. खरं तर, Croma वर सध्या Everything Apple sale सुरू आहे. ही सेल 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत Live असणार आहे. सेल दरम्यान, Apple च्या विविध डिवाइसेसवर बंपर डील देण्यात येत आहेत. दरम्यान, या सेलमध्ये लेटेस्ट iPhone 15 सर्वात कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे.
iPhone 15 च्या 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 79,990 रुपये आहे, जी सेल दरम्यान 71,990 रुपयांना विकली जात आहे. मात्र, यासह या लेटेस्ट आणि लोकप्रिय स्मार्टफोनवर ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 15 वर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन, 4000 रुपयांची बँक कॅशबॅक ऑफर दिली जात आहे.
iPhone 15
एवढेच नाही तर, फोनवर 6000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. तसेच, जर तुमच्याकडे जुना iPhone असेल तर, त्या आयफोनच्या एक्सचेंजवर iPhone 15 वर तब्बल 23000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मात्र, यासाठी तुमच्या जुन्या किंवा विद्यमान मॉडेलची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे. अशाप्रकारे वरील सर्व ऑफर्ससह तुम्ही सेल दरम्यान iPhone 15 37,990 रुपयांना खरेदी करू शकाल.
iPhone 15 चे मुख्य तपशील
iPhone 15 मध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर देण्यात आले आहे. तसेच, सुरळीत कामकाजासाठी A16 Bionic चिप देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनेक ऍडव्हान्स फीचर्स मिळणार आहेत. फोटोग्राफीसाठी iPhone 15 मध्ये एक 48MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे. यासोबतच 12MP सेकंडरी कॅमेरा समाविष्ट केला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile