Online Payment: 31 मार्चनंतर Online पेमेंट करणे होईल कठीण ! आजच ‘हे’ काम पूर्ण करा

HIGHLIGHTS

PAN Card अवैध झाले तर बँकिंग व्यवहार करण्यात अडचण येईल.

31 मार्च नंतर 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर परिणाम होणार

तुमचे पॅन कार्ड आधारही लिंक आहे का ? कसे ओळखता येईल?

Online Payment: 31 मार्चनंतर Online पेमेंट करणे होईल कठीण ! आजच ‘हे’ काम पूर्ण करा

PAN कार्ड Aadhar शी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी केंद्र सरकारने 31 मार्च 2023 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. यानंतर तुमचे पॅन कार्ड रद्द होईल. जर पॅन कार्ड अवैध झाले तर बँकिंग व्यवहार करण्यात अडचण येऊ शकते. 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. तुमचे पॅन कार्ड अवैध ठरल्यास 31 मार्चनंतर 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Realme चा 32 इंच टीव्ही फक्त 2,849 रुपयांमध्ये खरेदी करा, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही

1000 रुपये दंड: 

जर तुम्ही 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी पॅन लिंक केले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र यानंतर तुमचा पॅन रद्द केला जाईल. तसेच, पॅन सक्रिय करण्यासाठी, लेट पेमेंट म्हणून 1000 रुपये दंड भरावा लागेल.

पॅनला आधार लिंक करण्याची प्रक्रिया : 

– सर्व प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर क्लिक करा.

– त्यानंतर डाव्या बाजूला Quick Links वर क्लिक करा.

– त्यानंतर Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे पॅन आणि आधार क्रमांक टाकावा लागेल.

– याच्या खाली उजव्या बाजूचे व्हॅलिडेट बटण क्लिक करावे लागेल.

– त्यानंतर नाव, जन्मतारीख आणि पत्त्याची पडताळणी होईल.

– त्यानंतर OTP व्हेरिफिकेशन आधारला पॅनशी लिंक करेल.

तुमचे पॅन कार्ड आधारही लिंक आहे का ? कसे ओळखता येईल? 

– सर्व प्रथम https://uidai.gov.in/ वेबसाइटवर जा.

– यानंतर आधार सर्व्हिस मेनूच्या Aadhaar Linking Status ला भेट द्या.

– त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि गेट स्टेटस बटणवर टॅप करा.

– त्यानंतर पॅन नंबर आणि कॅप्चा कोड टाका.

– यानंतर Get Linking Status वर क्लिक करा.

– अशा प्रकारे पॅन आधारशी लिंक आहे की नाही हे निश्चित केले जाऊ शकते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo