Voter ID Card Download: तुमचे वोटर ID कार्ड हरवले आहे का? बघा नवीन ओळखपत्र डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया। Tech News 

Voter ID Card Download: तुमचे वोटर ID कार्ड हरवले आहे का? बघा नवीन ओळखपत्र डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया। Tech News 
HIGHLIGHTS

लोकसभा 2024 निवडणुका पुढील महिन्यात म्हणजेच 19 एप्रिलपासून सुरु होणार आहेत.

जर तुमचे Voter ID कार्ड हरवले तर तुम्ही मतदान करू शकत नाही.

जाणून घ्या नवे Voter ID डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया

लोकसभा 2024 निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पुढील महिन्यात म्हणजेच 19 एप्रिलपासून निवडणुका सुरू होणार आहेत. निवडणुकीत मतदान करणे हा प्रत्येक भारतीयाचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करण्यासाठी तुम्हाला एका महत्त्वाचा दस्तऐवजाची गरज आहे. हे दस्तऐवज म्हणजे ‘Voter ID’ आहे. होय, वोटर ID कार्डशिवाय तुम्ही मतदान करू शकत नाही. मतदार ओळखपत्र हे तुमचे ओळखपत्र म्हणून काम करते. पण जर तुमचे ओळखपात्र हरवले तर? तर काही काळजी करू नका. नवे Voter ID डाउनलोड करण्याची सोपी प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे सुद्धा वाचा: Loksabha Election 2024: Voter ID Card बनवण्यासाठी घरबसल्या Online अप्लाय करा, बघा सोपी प्रक्रिया

how to apply voter id card online 1
voter id card online 1

Voter ID Card हरवल्यास काय करावे?

अनेकदा लोक आपली महत्त्वाची कागदपत्रे कुठेतरी ठेवायला विसरतात. तुमच्यासोबतही असे घडते का? तुमचा Voter ID उपलब्ध नसेल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला मतदान ओळखपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. यासह तुम्ही नवीन Voter ID Card ऑनलाइन सहजपणे डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. नवा Voter ID डाउनलोड करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे:

घरबसल्या Voter ID Card कसे डाउनलोड करावे?

how to apply voter id card online 2
voter id card online 2
  • सर्वप्रथम तुमचे Voter ID Card ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी, प्रथम तुमच्या लॅपटॉप किंवा फोनमध्ये नेशन व्होटर सर्व्हिस पोर्टल (https://voters.eci.gov.in/) ओपन करा.
  • यानंतर आता तुम्हाला या पोर्टलच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या E-Epic डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता पुढील विंडोवर तुम्हाला लॉगिन पेज दिसेल.
  • या पेजवर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी किंवा EPIC क्रमांक टाकून तुम्ही तुमचे Voter ID शोधू शकता.
  • मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि रिक्वेस्ट OTP वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला तुमच्या नंबरवर एक OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड मिळेल.
  • अखेर हा OTP टाकून, तुम्ही तुमचे Voter ID Card ऑनलाइन उघडू शकता आणि ते डाउनलोड करू शकता.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

 
Digit.in
Logo
Digit.in
Logo