Samsung Galaxy F55 5G ची नवी भारतीय लाँच डेट जाहीर, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि सर्व डिटेल्स। Tech News 

Samsung Galaxy F55 5G ची नवी भारतीय लाँच डेट जाहीर, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि सर्व डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होणार Samsung Galaxy F55 5G स्मार्टफोन

आगामी Galaxy F55 5G स्मार्टफोनचे लाँच 17 मे रोजी शेड्यूल केले गेले होते.

या स्मार्टफोनची विक्री Flipkart, Samsung.com कंपनीच्या अधिकृत साईटवरून होईल.

Samsung चा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Samsung Galaxy F55 5G च्या भारतीय लाँचची चर्चा टेक विश्वात जोरात सुरु आहे. आगामी Galaxy F55 5G स्मार्टफोनचे लाँच आज 17 मे रोजी शेड्यूल केले गेले होते. परंतु, आता या स्मार्टफोनचे लाँच मे च्या शेवटीपर्यंत वाढवलेले आहे. मिळाल्येल्या माहितीनुसार, कंपनी आता भारतात येत्या 27 मे रोजी Samsung Galaxy F55 5G लाँच करेल. मात्र, या फोनचे लाँच पुढे का ढकलण्यात आले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे सुद्धा वाचा: Infinix GT 20 Pro ची किंमत लाँचपूर्वीच Confirm! आतापर्यंतचा सर्वात Powerful गेमिंग फोन। Tech News

Samsung Galaxy F55 5G ची अपेक्षित किंमत

Samsung Galaxy F55 5G ची किंमत 2x,999 रुपये इतकी सांगण्यात आली आहे. हा फोन 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत सादर केला जाण्याची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हा स्मार्टफोन व्हेगन लेदर फिनिशमध्ये येईल आणि मागील बाजूस सॅडल स्टिच पॅटर्न मिळेल. 2024 मध्ये हा या विभागातील सर्वात स्लिम आणि सर्वात हलका वेगन लेदर स्मार्टफोन असेल.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची विक्री Flipkart, Samsung.com आणि देशभरातील निवडक रिटेल स्टोअरमध्ये केली जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, Galaxy F55 5G कलर ऑप्शन्स Apricot Crush आणि Raisin Black आहेत.

Samsung Galaxy F55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F55 मध्ये 6.7-इंच लांबीचा सुपर AMOLED प्लस डिस्प्ले मिळेल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतील. हा डिस्प्ले 1,000 nits पीक ब्राइटनेससह येईल. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चिपसेटवर चालण्याची अपेक्षा आहे. हा फोन 8GB RAM आणि 128GB/256GB अशा दोन स्टोरेज ऑप्शन्ससह सादर केले जाऊ शकतो.

samsung galaxy f55 5g

फोटोग्राफीसाठी, Galaxy F55 5G मध्ये OIS सह 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असू शकतो. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 50MP सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी मिळू शकते. Samsung Galaxy F55 5G चे सर्व फीचर्स हा फोन लाँच झाल्यानंतरच कन्फर्म होतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo