Netflix ने दिला युजर्सना मोठा धक्का! पुढील महिन्यापासून Important फिचर होणार बंद, वाचा डिटेल्स

Netflix ने दिला युजर्सना मोठा धक्का! पुढील महिन्यापासून Important फिचर होणार बंद, वाचा डिटेल्स
HIGHLIGHTS

Netflix ने अलीकडेच पासवर्ड शेअरिंग फीचर बंद केले.

Netflix ऑफलाइन व्हिडिओ डाउनलोड फीचर बंद होणार बंद?

जाणून घ्या Netflix च्या कोणत्या युजर्सचा डेटा खर्च वाढेल.

प्रसिद्ध आणि लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix कडून पुन्हा एकदा ग्राहकांना मोठा धक्का बसणार आहे. कंपनीने अलीकडेच पासवर्ड शेअरिंग फीचर बंद केले होते. ज्यामुळे आता Netflix च्या प्रत्येक युजरला वेगळे सबस्क्रिप्शन घेणे भाग आहे. दरम्यान, ही वृत्त ताजे असतानाच Netflix ने युजर्सना आणखी एक धक्का दिला आहे. होय, Netflix एक महत्त्वाची सुविधा बंद करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Netflix ऑफलाइन व्हिडिओ डाउनलोड फीचर बंद करत आहे.

हे सुद्धा वाचा: WhatsApp वर चॅटिंग होईल आणखी मजेशीर, लवकरच येणार नवे आणि Attractive थीम फिचर। Tech News

Netflix डाउनलोड सुविधा करणार बंद

आतापर्यंत Wi-Fi रेंज असताना वापरकर्ते Netflix मध्ये चित्रपट आणि शो डाउनलोड करून ठेवायचे. त्यानंतर, फ्री झाल्यावर आणि Wi-Fi नसताना इंटरनेटशिवाय चित्रपट आणि शोजचा आनंद घ्यायचे. पण, आता Netflix चे हे फीचर बंद झाल्यानंतर युजर्सच्या मोबाईल डेटाचा वापर वाढणार आहे. अशा परिस्थितीत युजर्सचा डेटा खर्च देखील वाढेल.

Netflix subscription plans
Netflix subscription plans

लक्षात घ्या की, अहवालानुसार Netflix विंडोज 10 आणि विंडोज 11 वापरकर्त्यांना Video डाउनलोड करण्याची परवानगी देणार नाही. याआधी वापरकर्ते 1080 पिक्सेल म्हणजेच फुल एचडी व्हिडिओ डाउनलोड करू शकत होते. मात्र, मोबाइल आणि टॅबलेट डिव्हाइसवरील युजर्सवर नव्या निर्णयाचा काहीहे फरक पडणार नाही. मोबाईल आणि टॅबलेट युजर्स टीव्ही शो आणि चित्रपट ऑफलाइन पाहू शकतात.

Netflix ऍड-सपोर्ट सबस्क्रिप्शन प्लॅन

Netflix च्या नवीन अपडेटनंतर वापरकर्ते स्वस्त रिचार्जद्वारे जाहिरातींसह चित्रपट आणि शोज बघू शकतात. या प्लॅनमध्ये व्यावसायिक ब्रेक असतील. त्याबरोबरच, नवीन Netflix ॲप कधी उपलब्ध होईल याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, पुढील महिन्यात ते उपलब्ध होईल, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. Netflix नुसार, वापरकर्ते आपोआप नवीन ॲपवर शिफ्ट होतील. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या भारतात कोणतीही ऍड-सपोर्ट कंटेंट उपलब्ध नाही. सध्या भारतात Netflix चा सर्वात स्वस्त सब्स्क्रिप्शन 149 रुपयांचा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo