TIPS : लॅपटॉप जलद गरम होण्याच्या समस्येने तुम्ही हैराण झालात? करा फक्त ‘हे’ काम

TIPS : लॅपटॉप जलद गरम होण्याच्या समस्येने तुम्ही हैराण झालात? करा फक्त ‘हे’ काम
HIGHLIGHTS

लॅपटॉप ओव्हरहीटिंगच्या समस्येने त्रस्त आहात.

अगदी सोप्या टिप्सचा अवलंब करा आणि लॅपटॉप गरम होण्याची समस्या होणार नाही.

तुमचा लॅपटॉप नेहमी मूळ चार्जरने चार्ज करावा.

कार्यालयीन कामासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी आपण अनेकदा लॅपटॉप वापरतो. कोरोनामुळे लॅपटॉपचा वापर वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन अभ्यासासाठीही केला जातोय. अनेक तास वापरल्यानंतर, लॅपटॉप खूप गरम होतो आणि यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर देखील परिणाम होतो. लॅपटॉपची थोडीशी उष्णता ही समस्या नसली तरी जास्त गरम होण्यामुळे तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जर तुम्हीही लॅपटॉप लवकर गरम होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे. 

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लॅपटॉपच्या काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे लॅपटॉप हीटिंगची समस्या होणार नाही. चला बघुयात टिप्स… 

हे सुद्धा वाचा : Xiaomi खरंच भारत सोडून जात आहे का ? कंपनीने स्वतः दिले स्पष्ट उत्तर…

लॅपटॉपवर धूळ बसू देऊ नका. 

लॅपटॉपच्या आत वायुवीजन आणि उष्णता नियंत्रित करण्यासाठी CPU फॅन आहेत. कालांतराने आणि योग्य देखभालीअभावी या फॅन्सवर भरपूर धूळ साचते. अशा परिस्थितीत लॅपटॉपच्या आत वेंटिलेशन व्यवस्थित होत नाही. यामुळे ते गरम होऊ लागते.

अशा स्थितीत लॅपटॉपमधील धूळ साफ करावी. यामुळे व्हेंटिलेशन सुधारेल आणि CPU फॅन्स उष्णता नियंत्रणात ठेवतील. लॅपटॉपमधील धूळ साफ करण्यासाठी तुम्ही लॅपटॉप इंजिनिअरची मदत घेऊ शकता. याशिवाय, जर तुम्हाला लॅपटॉप हार्डवेअरचे उत्तम ज्ञान असेल, तर सॉफ्ट ब्रशच्या मदतीने CPU आणि कुलिंग सिस्टममध्ये साचलेली धूळ स्वतः साफ करता येईल.

केवळ तुमचं लॅपटॉपच्या चार्जरचा वापर करा. 

अनेकदा आपण आपला लॅपटॉप बाह्य चार्जरने चार्ज करतो. या परिस्थितीत, ते जास्त गरम होण्याची शक्यता असते आणि लॅपटॉपमध्ये अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. तुमचा लॅपटॉप नेहमी मूळ चार्जरने चार्ज करावा.

अनावश्यक ऍप्लिकेशन्स बंद करा. 

लॅपटॉपमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त ऍप्स उघडू नका, त्याचा त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि लॅपटॉप गरम होऊ लागतो. अशा परिस्थितीत, बॅकग्राउंडला चालणारे अनावश्यक ऍप्स बंद करा. यासह, तुम्हाला लॅपटॉपमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससह अधिक बॅटरी लाइफ देखील मिळेल.

ओव्हर चार्जिंग टाळा. 

अनेकदा पूर्ण चार्ज केल्यानंतरही लोक लॅपटॉपला बराच वेळ चार्जिंगमध्ये ठेवतात. अशा स्थितीत, लॅपटॉप जास्त चार्ज होऊ लागतो आणि खूप गरम होतो. लक्षात ठेवा लॅपटॉप चार्ज केल्यानंतर लगेच चार्जर बाहेर काढून घ्या. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo