Its Here! Realme C65 5G फोन भारतात अप्रतिम फीचर्ससह लाँच, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत। Tech News 

Its Here! Realme C65 5G फोन भारतात अप्रतिम फीचर्ससह लाँच, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

Realme C65 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे.

Realme C65 5G फोनची सुरुवातीची किंमत 10,499 रुपये

SBI, HDFC आणि ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास सवलत

Realme C65 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने बजेट रेंजमध्ये सादर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, MediaTek D6300 चिपसेटसह येणारा हा हँडसेट जगातील पहिला स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत कंपनीने 10 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. याशिवाय Realme च्या या फोनमध्ये AI बूस्ट इंजिन देण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, Realme C65 5G स्मार्टफोनची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स.

हे सुद्धा वाचा: Good News! लोकप्रिय Samsung Galaxy S23 FE फोन तब्बल 10,000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

Realme C65 5G ची भारतात किंमत

Realme C65 स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4GB रॅमसह 64GB स्टोरेज आहे, जो 10,499 रुपयांना लाँच करण्यात आले आहे. तर, या फोनचा दुसरा व्हेरिएंट 11,499 रुपयांना आला आहे. त्याबरोबरच, फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह टॉप वेरिएंटची किंमत 12,499 रुपये आहे. हा फोन फेदर ग्रीन आणि ग्लोइंग ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे.

उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची विक्री आज म्हणजेच 26 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4:30 वाजता Flipkart वर सुरू होईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या सेलमध्ये 1000 रुपयांची सूट मिळेल. ही ऑफर SBI, HDFC आणि ICICI बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास मिळेल.

Realme C65 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme C65 5G launhed in india: Dimensity 6300 chipset, price range & more
Realme C65 5G launched in india: Dimensity 6300 chipset, price range & more

Realme C65 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. हा हँडसेट डायमेंसिटी 6300 5G प्रोसेसरसह येतो. वर सांगितल्याप्रमाणे, या प्रोसेसरसह येणार हा पहिला हँडसेट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये फोनच्या पुढील बाजूस 8MP कॅमेरा आहे. त्याबरोबरच, स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo