भारीच की! HMD चा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, ब्रँडने शेअर केले डिटेल्स। Tech News 

भारीच की! HMD चा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, ब्रँडने शेअर केले डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

HMD ने भारतीय बाजारात कंपनीचे नवीन फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे.

HMD कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच सादर करण्यात आलेले पल्स सीरिजचे स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले जाऊ शकतात.

HMD ने नुकतेच आपले तीन नवीन स्मार्टफोन ग्लोबली सादर केले आहेत. त्यानंतर, आता ब्रँडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली आहे की, 29 एप्रिल रोजी भारतीय बाजारात कंपनीच्या नवीन फोनची घोषणा केली जाईल. त्यावरून जागतिक बाजारपेठेत आलेले मोबाईल भारतात आणले जातील अशी अपेक्षा केली जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात HMD च्या नवीन फोन्सचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

HMD स्मार्टफोन भारतीय लाँच

HMD कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये नवीन फोनच्या घोषणेचे तपशील देण्यात आले आहेत. या पोस्टमध्ये ब्रँडने म्हटले आहे की, ते 29 एप्रिल रोजी नवीन स्मार्टफोनचे नाव उघड करणार आहेत.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, 29 एप्रिल रोजी भारतात नवीन फोनचे नाव घोषित झाल्यानंतर पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात हे स्मार्टफोन लाँच होतील. त्याबरोबरच, काही रिपोर्ट्सनुसार दोन दिवसांपूर्वीच सादर करण्यात आलेले पल्स सीरिजचे स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले जाऊ शकतात.

HMD Pulse आणि HMD Pulse+ स्मार्टफोनचे स्पेक्स

HMD Pulse Plus
HMD Pulse Plus

HMD पल्स आणि पल्स+ मध्ये 6.65-इंच लांबीचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. परफॉर्मन्ससाठी, दोन्ही फोन UNISOC T606 चिपसेटसह येतात. या दोन्ही फोनमध्ये मध्ये 6GB पर्यंत RAM आणि 64GB आणि 128GB अंतर्गत स्टोरेज आहे. HMD Pulse+ मध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा आणि सेकंडरी सेन्सर आहे.

तर, HMD Pulse मध्ये AF ड्युअल LED फ्लॅशसह 13MP प्राथमिक कॅमेरा आहे. त्याबरोबरच, या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP लेन्स आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, HMD Pulse आणि HMD Pulse+ 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरीसह येतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo