WhatsApp ने सर्व निर्बंध हटवले: आता तुम्हाला ‘हे’ काम उघडपणे मेसेजमध्ये करता येईल

WhatsApp ने सर्व निर्बंध हटवले: आता तुम्हाला ‘हे’ काम उघडपणे मेसेजमध्ये करता येईल
HIGHLIGHTS

WhatsApp ने निर्बंध हटवले

मेटाचे CEO मार्क झुकरबर्गने दिली माहिती

मॅसेजिंग ऍपमध्ये येणार अनेक नवीन फिचर

व्हॉट्सऍप रिऍक्ट फीचर रोल आऊट झाल्यानंतर दोन महिन्यांनी मोठे अपडेट मिळत आहे. वास्तविक, पूर्वी हे फिचर फक्त लाईक, लव्ह, लाफ, सरप्राईज, सॅड आणि थँक यू अशा 6 रिऍक्शनपुरते मर्यादित होते, परंतु आता वापरकर्ते मॅसेजवर प्रतिक्रिया देताना कोणतेही इमोजी वापरू शकतील. 

हे सुद्धा वाचा : Vivo T1x स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, जाणून संभाव्य किंमत आणि जबरदस्त फीचर्स

व्हॉट्सऍपची मूळ कंपनी मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः इंस्टाग्राम पोस्टमध्ये या नवीन फीचरची घोषणा केली आहे. रिऍक्शन अपडेटच्या रोलआउटची घोषणा करणाऱ्या त्याच्या पोस्टमध्ये, मार्कने त्याच्या रिऍक्शनसाठी काही आवडते इमोजी देखील शेअर केले आहेत. ज्यात रोबोट फेस, फ्रेंच फ्राईज, मेन सर्फिंग, सनग्लासेस स्माइली, 100 टक्के सिम्बॉल आणि फिस्ट बंप यांचा समावेश आहे. WhatsApp द्वारे किमान 4 वर्षांच्या चाचणीनंतर, WhatsApp React फीचर पहिल्यांदा मे महिन्याच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले होते.

अनेक नवीन फीचर्स येणार  

बीटा टेस्टर्सच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सऍप अलीकडच्या काळात अनेक फीचर्सची चाचणी करत आहे. यामध्ये Android फोनसाठी चॅट सिंक फिचर समाविष्ट आहे. जे वापरकर्त्यांना इतर हँडसेटवरून लॉग इन करण्याची परवानगी देते. तसेच विशिष्ट संपर्कांपासून तुमची ऑनलाइन स्थिती लपवण्याची क्षमता आणि बरेच काही करता येईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mark Zuckerberg (@zuck)

जूनमध्ये, व्हॉट्सऍपने वापरकर्त्यांसाठी ग्रॅन्युलर प्रायव्हसी कंट्रोल्स आणण्यास सुरुवात केली. ज्यामुळे युजर्सना  त्यांच्या संपर्कांपैकी कोण त्यांचे स्टेटस, त्यांचा लास्ट सीन आणि त्यांचा प्रोफाईल फोटो पाहू शकेल, हे निवडता येईल. झुकेरबर्गने अलीकडेच जूनमध्ये घोषणा केली होती की, अँड्रॉइड स्मार्टफोनवरून iPhone वर WhatsApp डेटा सहजपणे हस्तांतरित करण्याची क्षमता लवकरच सुरू केली जाईल. ताज्या अहवालानुसार, अद्याप त्या फीचरची  टेस्टिंग सुरु आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo