Lok Sabha Elections 2024: मतदान करायचंय? पण Voter ID Card नाही! बघा पर्यायी कार्ड्सची यादी। Tech News 

Lok Sabha Elections 2024: मतदान करायचंय? पण Voter ID Card नाही! बघा पर्यायी कार्ड्सची यादी। Tech News 
HIGHLIGHTS

भारतात 19 एप्रिलपासून लोकसभा 2024 निवडणुकीच्या टप्प्यांना सुरुवात झाली आहे.

मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणेजच Voter ID कार्ड असणे आवश्यक

Voter ID कार्ड नसल्यास निवडणूक आयोगाने 11 पर्यायी ओळखपत्र दिले आहेत.

भारतात 19 एप्रिलपासून लोकसभा 2024 निवडणुकीच्या टप्प्यांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, मतदारांना त्यांच्या मतदारसंघात मतदान करण्यासाठी त्यांचे मतदार ओळखपत्र म्हणेजच Voter ID कार्ड सोबत ठेवावे लागेल. परंतु, बरेचदा असे होते की, लोकांना त्यांचे मतदान ओळखपत्र शेवटच्या क्षणी मिळत नाही किंवा ते हरवतात. पण काळजी करू नका, अशा लोकांसाठी निवडणूक आयोगाने 11 पर्यायी ओळखपत्र दिले आहेत. ज्यांचा वापर करून मतदान करता येईल.

how to apply voter id card online 2
voter id card

मतदान करण्यासाठी Voter ID शिवाय 11 पर्यायी ओळखपत्र

  • जेव्हा मतदाराचे मतदार ओळखपत्र हरवते, तेव्हा ते लोकसभा 2024 निवडणुकीत मतदान करण्यासाठी आपले ‘Aadhar Card’ मतदान केंद्रावर आणू शकतो.
  • दुसरा पर्यायी दस्तऐवज म्हणजे मतदान करण्यासाठी त्याचे ‘पासबुक’ वापरता येईल. मात्र, पासबुकमध्ये तुमचा फोटो असणे आवश्यक आहे, जे बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केले असले पाहिजे.
  • तुम्ही Voter ID शिवाय मतदान करण्यासाठी ‘MGNREGA जॉब कार्ड’ देखील वापरू शकता.
  • यादीतील चौथे दस्तऐवज ‘आरोग्य विमा स्मार्ट कार्ड’ होय. जे कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केले जाते.
  • मतदान करण्यासाठी मतदार ओळखीचा पुरावा म्हणून त्यांचा वाहन चालविण्याचा परवाना (Driving Liscence) मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकतात.
voter ID card
voter ID card
  • ‘भारतीय पासपोर्ट’ धारक त्यांच्या ओळखीचा पुरावा देण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी या दस्तऐवजाचा वापर करू शकतात.
  • याशिवाय लोक मतदानासाठी मतदार ओळखपत्राऐवजी त्यांचे PAN कार्ड वापरू शकतात
  • NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड
  • केंद्र/राज्य सरकार/पीएसयू/पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेली फोटो असलेली सेवा ओळखपत्रे
  • खासदार/आमदार/एमएलसी यांना जारी केलेली अधिकृत ओळखपत्रे
  • युनिक डिसॅबिलिटी आयडी (UDID) कार्ड, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार.

अशाप्रकारे वरील सर्व कार्डद्वारे तुम्ही तुमचे Voter ID कार्डशिवाय मतदान करण्यास सक्षम असाल. त्यामुळे जर तुमचे मतदान ओळखपत्र वेळेवर हरवले तरीही तुम्ही वरील पर्यायी कार्ड्ससह मतदान करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo