हा स्मार्टफोन 1.3GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवता येते.
मोबाईल निर्माता कंपनी लेनोवोने बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वाइब S1 लाइट लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या स्मार्टफोनची किंमत 199 डॉलर (जवळपास १३,२५० रुपये) ठेवली आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
लेनोवो वाइब S1 लाइट स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz ऑक्टा-कोर मिडियाटेक प्रोसेसर आणि 2GB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल-टोन LED फ्लॅश आणि BSI सेंसर दिला असून १३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालणारा लेनोवो वाइब S1 लाइट एक ड्यूल सिम ड्यूल स्टँडबाय हँडसेट आहे. ह्यात 2700mAh ची बॅटरी दिली आहे.
लेनोवो वाइब S1 लाइटचे परिमाण 145x71x8.5mm आणि वजन 129 ग्रॅम आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 4G, 3G, ब्लूटुथ, वायफाय, GPS/A-GPS आणि मायक्रो-USB फीचर आहे.