Good News! Samsung Galaxy S सीरीजचा ‘हा’ स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह खरेदी करा, बघा डिल्स। Tech News 

Good News! Samsung Galaxy S सीरीजचा ‘हा’ स्मार्टफोन प्रचंड सवलतीसह खरेदी करा, बघा डिल्स। Tech News 
HIGHLIGHTS

Samsung Galaxy S23 5G ची किंमत कमालीची कमी झाली आहे.

या फोनच्या दरात आता थेट 25,000 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

प्रोसेसिंगसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

आपणा सर्वांना माहितीच आहे की, Samsung Galaxy ‘S’ ही ब्रँडची सर्वात महागडी आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज आहे. आपल्या चाहत्यांना भेटवस्तू देत, कंपनीने Samsung Galaxy S23 5G ची किंमत ऑफर्ससह कमालीची कमी केली आहे. यासह तुम्ही हा महागडा फोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy S23 5G किती स्वस्तात मिळेल.

हे सुद्धा वाचा: Price Cut! Redmi Note 13, Note 13 Pro आणि Note 13 Pro+ फोन झा स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत| Tech News

Samsung Galaxy S23 5G Offers

Samsung ने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या विक्रीसाठी शॉपिंग साइट Flipkart सोबत हातमिळवणी केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, ‘फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल’मध्ये या मोबाईलच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्यानंतर हा 64,999 रुपये किंमतीसह सूचीबद्ध आहे. Samsung S23 च्या दोन्ही मेमरी वेरिएंटच्या किंमतीत बरीच कपात करण्यात आली आहे. तुम्हाला या फोनवर 25000 रुपयांचा एक्सट्रा ऑफ मिळत आहे. येथून खरेदी करा

samsung galaxy s23 5g flipkart discount

त्याबरोबरच, याशिवाय Flipkart एक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळेल. मात्र, लक्षात घ्या की, Samsung Galaxy S23 5G वरील ही कायमस्वरूपी किंमत कपात नाही.

Samsung Galaxy S23 5G

Samsung Galaxy S23 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंच लांबीचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. प्रोसेसिंगसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. हा फोन 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह येतो.

फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा, 50MP वाईड कॅमेरा आणि 10MP टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे, जो 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. तसेच, हा फोन 12MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. पॉवरसाठी फोनमध्ये 3,900mAh बॅटरी आहे, जी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी ती 25W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo