एखादी सायकल भारताच्या ग्रामीण भागातील विजेचं संकट सोडवू शकते का?

एखादी सायकल भारताच्या ग्रामीण भागातील विजेचं संकट सोडवू शकते का?
HIGHLIGHTS

इलेक्ट्रिक मुक्त असलेल्या ह्या सायकलची किंमत १२,००० आणि १५,००० रुपये इतकी आहे आणि ही ग्रामीण भागात २४ तास वीज देऊ शकते.

तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये पुर्ण पानावर आलेली जाहिरात पाहिली का, ज्यात असा उल्लेख केला होता की, “येत्या काही दिवसात मोफत वीज मिळणार आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदलही होणार आहे(Free elctricity is coming & billions in change)”. मी ही जाहिरात वर्तमानपत्रात अनेकदा पाहिली आहे आणि ती  मनोज भार्गवसारख्या काही अब्जाधीशांसाठी PR कॅम्पेन म्हणून बनवली आहे, असे सांगून ती चुकीच्या पद्धतीने मांडली . (ह्या जाहीरातीमधून बहुदा त्यांना त्यांचा अब्जाधीश, समाजसेवक असलेला हुद्दा सांगायचा असावा.) खरे पाहता, मी थोडा चूक आणि थोडा बरोबरही होतो. हो, भार्गव हे एक अब्जोपती आहेत आणि ते Innovation Ventures चे संस्थापक आहे. त्या कंपनीचे नाव ‘5-Hour Energy’ drink असे आहे. पण ही जाहिरात फक्त एक पब्लिसिटी स्टंट नाही. पण जेव्हा ते “Free electricity is coming” असे म्हणतात, तेव्हा भार्गव खरोखरच त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

मागच्या शुक्रवारी भार्गव आणि त्यांची टीम गेली दोन वर्षे नेमकं काय काम करत आहे हे नवी दिल्लीने पाहिले. त्याला फ्री इलेक्टिक असे म्हणतात, जी एक स्थिर सायकल आहे जी त्यात असलेली बॅटरी एका तासात पुर्ण चार्ज करते आणि त्यानंतर ग्रामीण भागात २४ तास वीजपुरवठा करते. त्याला  पेडलिंग आणि पुर्ण चार्जिंग केल्यावर,  ती लाइट बल्ब, पंखा, सेलफोन आणि अगदी कमी वॅटेज असणा-या टीव्हीला सुद्धा पॉवर देते. फ्री इलेक्ट्रिकची किंमत ही १२,००० ते १५,००० रुपयांदरम्यान असेल आणि मार्च २०१६ मध्ये बाजारात उपलब्ध होईल. आश्चर्याची बाब म्हणजे, भार्गव ह्याच्या वितरणासाठी कोणत्याही NGOs ची किंवा सरकारची मदत घेत नाही आहे. ते म्हणतात, “ना-नफा हे खरंच भयानक आहे. पण तरीही ते सरकारी कामापेक्षा नक्कीच वाईट नाही.”

ही फ्री इलेक्ट्रिक बाइक भारत आणि अमेरिकेत उत्पादित केली जाईल. भार्गव यांनी सांगितले की, ह्यात त्यांना त्यांची ९९ टक्के संपत्ती गहाण ठेवावी लागेल आणि ही किंमत जवळपास डॉलर ४ अब्ज इतकी असू शकते.

ग्रामीण भागातील विद्युतीकरणाच्या दिशेने भारताचे अतोनात प्रयत्न चालू आहेत.एवढेच नव्हे तर, ग्रामीण विद्युतीकरणामुळे भारतात २०१२ मध्ये असलेली २१% दारिद्र्य रेषा कमी होऊन २०१५ मध्ये ती १२.४% वर आली आहे. वर्ल्ड बँकच्या म्हणण्यानुसार, “ग्रामीण विद्युतीकरणामुळे वापर आणि मिळकतीत बदल झाले आहेत.” त्यामुळे ग्रामीण भागासाठी ही फ्री इलेक्ट्रिक सायकल नक्कीच फायदेशीर ठरु शकते. पण जर ह्याच्या किंमतीचा विचार केला तर, ही ग्रामीण भागातील लोकांना ही परवडणारी नाही. पण ह्यावर भार्गव यांनी स्पष्टीकरण दिले की, प्रत्येक कुटूंबाला ही खरेदी करण्याची गरज नाही. आणि एखादा उद्योजक यूटीलिटी प्रदाता म्हणून काम करु शकतो. त्याने एकाचवेळी ही बाइक आणि काही वीज बॅटरी खरेदी करावी.

येथे आपल्याला Billions in Change चे ट्रेलर पाहायला मिळेल, ज्यात भार्गव आणि त्यांची टीम त्यांचे स्टेज 2 इनोव्हेशन दाखवत आहेत.

 

Adamya Sharma

Adamya Sharma

Managing editor, Digit.in - News Junkie, Movie Buff, Tech Whizz! View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo