पुढल्या महिन्यात भारतात एंट्री घेऊ शकतो XIAOMI REDMI 7A, बघा याची खासियत

पुढल्या महिन्यात भारतात एंट्री घेऊ शकतो XIAOMI REDMI 7A, बघा याची खासियत
HIGHLIGHTS

शाओमीचा लेटेस्ट फोन आहे Redmi 7A

Qualcomm Snapdragon 439 octa-core चिपसेट सह येतो हा फोन

चीन मध्ये आधीच लॉन्च झाला आहे फोन

स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi लवकरच आपला Redmi 7A स्मार्टफोन भारतात पण लॉन्च करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच यासंबंधित आलेल्या रिपोर्ट्स नुसार शाओमी हा स्मार्टफोन पुढल्या महिन्यात भारतीय मार्केट मध्ये लॉन्च करू शकते. Redmi 7A Qualcomm च्या Snapdragon 439 octa-core चिपसेट द्वारा संचालित आहे. विशेष म्हणजे हा फोन चीनी मार्केट मध्ये लॉन्च केला आहे आणि आता हा भारतात येईल. 

जुलाई मध्ये हा Redmi 7A स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. कंपनीने अजूनतरी याची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही कि कोणत्या दिवशी हा फोन सादर केला जाईल. हा स्मार्टफोन MIUI 10 वर चालतो जो एंड्रॉइड 9 पाई आधारित आहे. 

REDMI 7A ची अंदाजे किंमत

 

Xiaomi नुसार चीन मध्ये रेडमी 7A ची किंमत 549 चीनी युआन म्हणजे जवळपास 5,500 रुपयांपासून सुरु होत आहे ज्यात यूजर्सना बेस वेरीएंट 2 जीबी+16 जीबी मिळतो. सोबतच याचा 2 जीबी+32 जीबी स्टोरेज वेरीएंट  599 चीनी युआन म्हणजे जवळपास 6,000 रुपयांमध्ये मिळतो. अशा आहे कि याच किंमतीच्या आसपास भारतात हा स्मार्टफोन येईल. 

XIAOMI REDMI 7A SPECIFICATIONS

 

Xiaomi Redmi 7A चे स्पेक्स पाहता चीन मध्ये हा लॉन्च होताच याचे स्पेक्स समजले आहेत आणि त्यावरून भारतात पण या डिवाइसच्या स्पेक्सचा अंदाज लावता येऊ शकतो. डिवाइसला पॉलीकार्बोनेट बॅक देण्यात आली आहे आणि हा स्प्लॅश प्रुफ बनवण्यासाठी P2i नॅनो-कोटिंग देण्यात आली आहे. Xiaomi Redmi 7A एंडरोइड 9 पाई वर आधारित MIUI 10 वर लॉन्च केला गेला आहे. 

फोन मध्ये 5.45-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो 18:9 आहे आणि हा एक HD+ डिस्प्ले आहे. रेडमी 7A स्नॅपड्रॅगॉन 439 ओक्टा-कोर चिपसेट सह लॉन्च केला गेला आहे जो 1.95GHz वर क्लोक्ड आहे. 

अजूनतरी डिवाइसच्या रॅम आणि स्टोरेज पर्यायांचा खुलासा झाला नाही पण डिवाइस मध्ये डेडिकेटेड माइक्रो SD कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. Xiaomi ने डिवाइस मध्ये 4,000mAh ची बॅटरी दिली आहे जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेरा डिपार्टमेंट पाहता डिवाइस मध्ये 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यासोबत एक LED फ्लॅश आहे. सेल्फी साठी या फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

हँडसेटच्या मागे फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे आणि सोबतच हा AI-आधारित फेस अनलॉकला पण सपोर्ट करतो. कनेक्टीविटी साठी डिवाइस मध्ये ड्यूल-सिम, 4G VoLTE, Wi-Fi, ब्लुटूथ 4.2, GPS, माइक्रो USB पोर्ट आणि 3.5mm आहे डफोन जॅक देण्यात आला आहे. 

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo