Attractive डिझाईनसह येणारा Nothing Phone 2a नव्या रंगात भारतात लाँच, जाणून घ्या काय विशेष? Tech News 

Attractive डिझाईनसह येणारा Nothing Phone 2a नव्या रंगात भारतात लाँच, जाणून घ्या काय विशेष? Tech News 
HIGHLIGHTS

Nothing ने अलीकडेच आपला तिसरा लेटेस्ट Nothing Phone 2a स्मार्टफोन सादर केला.

आता कंपनीने एक नवीन 'Nothing Phone 2a ब्लु' कलर व्हेरिएंट लाँच केला आहे.

या फोनच्या नव्या व्हेरिएंटची विक्री 2 मे रोजी दुपारी 12:00 वाजता सुरू होईल.

Nothing स्मार्टफोन्स आपल्या अनोख्या पारदर्शक डिझाईनमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता ब्रँडने अलीकडेच म्हणजे गेल्या महिन्यात आपला तिसरा लेटेस्ट Nothing Phone 2a स्मार्टफोन सादर केला. लाँच होताच नव्या स्मार्टफोनला उत्तम प्रतिसाद मिळाला. दरम्यान आता या त्याची विक्री आणखी वाढवण्यासाठी एक नवीन ‘Nothing Phone 2a ब्लु’ कलर व्हेरिएंट लॉन्च करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा: Samsung Galaxy F55 5G चे भारतीय लाँच Confirm! लेदर फिनिशमध्ये ‘या’ दिवशी होणार दाखल। Tech News

Nothing Phone (2a) ची किंमत

128GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी Nothing Phone (2a) ब्लू कलर व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर, फोनच्या 12GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लॉन्च ऑफर अंतर्गत तुम्हाला सेलच्या दिवशी हा फोन फक्त 19,999 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी मिळेल. यासोबतच ब्रँड आपली ऑडिओ डिव्हाइसेस देखील गिफ्ट करणार आहे.

हा नवा स्मार्टफोन विक्रीसाठी Flipkart वर उपलब्ध असेल. नवीन ब्लु कलर व्हेरिएंटची किंमत ब्लॅक आणि व्हाईट ऑप्शन्सपेक्षा जास्त आहे. या फोनची विक्री 2 मे रोजी दुपारी 12:00 वाजता सुरू होईल.

Nothing Phone (2a) मध्ये काय विशेष?

Nothing Phone (2a) मागील बाजूस समान ग्लिफ इंटरफेससह ब्लु शेडमध्ये लाँच झाला आहे. वेगळा रंग आणि वाढलेली किंमत याशिवाय यात इतर मॉडेल्सपेक्षा काहीही फरक नाही. एवढेच नाही तर, या फोनच्या फीचर्समध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Nothing Phone (2a)

nothing phone 2a blue colour varient launched in india

Nothing Phone (2a) मध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. एवढेच नाही तर, यात गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देखील आहे. फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, पॉवरफुल MediaTek Dimensity 7200 Pro चिपसेटसह येतो. फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये OIS + EIS सह 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तसेच, यात आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo