नवीन रेंडर वरून Motorola G7 सीरीजच्या चारही फोन्सचा झाला खुलासा

नवीन रेंडर वरून Motorola G7 सीरीजच्या चारही फोन्सचा झाला खुलासा
HIGHLIGHTS

मोटोरोला पुढल्या वर्षी आपल्या G7 सीरीज मध्ये चार फोन्स लॉन्च करणार आहे ज्यांच्याबद्दल समोर आलेल्या रेंडर वरून काही नवीन माहिती समोर आली आहे.

महत्वाचे मुद्दे:
 

  • Moto G7 आणि Moto G7 Plus मध्ये दिला जाईल वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले
  • Moto G7 Power आणि Moto G7 Play येतील iPhone X सारख्या नॉच सह
  • 2019 च्या सुरवातीला लॉन्च होऊ शकतात हे चारही फोन्स

मोटोरोला पुढल्या वर्षी 2019 च्या सुरवातीला चार फोन्स लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या फोन्सच्या लॉन्च च्या आधी यांचबद्दल अनेक लीक्स समोर येत आहेत. आता या तिन्ही फोन्सच्या रेंडर्स वरून डिवाइसेज्या सर्व साइड्सची माहिती मिळाली आहे. रेंडर वरून समजले आहे की Moto G7 आणि Moto G7 Plus मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाईल तर Moto G7 Power आणि Moto G7 Play मध्ये iPhone X मधील मोठी नॉच असेल. फोटो बघून आपण अंदाज लावू शकतो की Moto G7 आणि Moto G7 Plus स्मार्टफोन्स Moto G7 Power आणि Moto G7 Play पेक्षा महाग असतील.

रेंडर्स नुसार Moto G7 Power आणि Moto G7 Play च्या रियर पॅनल वर फक्त सिंगल रियर कॅमेरा दिला जाईल, तर Moto G7 आणि Moto G7 Plus मध्ये डुअल कॅमेरा सेटअप असेल. नवीन रिपोर्ट वरून असा पण खुलासा झाला आहे की Moto G7 आणि G7 Plus मध्ये एक वॉटरड्रॉप नॉच दिली जाईल जी Oppo F9 आणि Realme 2 Pro मध्ये असलेल्या नॉचशी मिळती जुळती आहे. दुसरीकडे Moto G7 Power आणि Moto G7 Play मध्ये ट्रेडिशनल नॉच असेल ज्यात सेल्फी कॅमेरा, सेंसर्स आणि इयरपीसला जागा दिली जाईल. Moto G7 आणि Moto G7 Plus बद्दल बोलायचे तर हे फोन हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो घेऊन येतील.

Motorola G7 सीरीज स्पेसिफिकेशन्स

मोटोरोलाच्या या चारही फोन्सचे स्पेसिफिकेशन्स आधीच समोर आले होते. आधीच्या रिपोर्ट्स वरून समजत आहे की Moto G7 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह येईल. Moto G7 Plus पाहता हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 प्रोसेसर, 4GB आणि 6GB रॅम तसेच 64GB इंटरनल स्टोरेज सह येईल.

इतर रुमर्स पाहता Moto G7 Power मध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी असेल. रिपोर्ट वरून संकेत मिळत आहेत की G7 Power मध्ये G7 सीरीजच्या इतर फोन्सच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली जाईल. तसेच Moto G7 वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येण्याची शक्यता पण आहे.

 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo