Vivo V30e Launch: 50 MP सेल्फी कॅमेरासह लेटेस्ट स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, येथे बघा LIVE इवेंट। Tech News 

Vivo V30e Launch: 50 MP सेल्फी कॅमेरासह लेटेस्ट स्मार्टफोन लवकरच भारतात होणार लाँच, येथे बघा LIVE इवेंट। Tech News 
HIGHLIGHTS

कंपनी Vivo V30e चा आणखी एक स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे.

हा फोन लवकरच 2 मे रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच केला जाईल.

फोनमध्ये 50MP चा पोर्ट्रेट कॅमेरा दिला जाईल, जो Sony IMX882 सेंसर असेल

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Vivo V30 आणि Vivo V30 Pro नंतर आता कंपनी आपल्या Vivo V30e हा सिरीजचा आणखी एक स्मार्टफोन भारतात सादर करणार आहे. हा फोन लवकरच 2 मे रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच केला जाईल. या फोनमध्ये 3D वक्र डिस्प्ले आणि 50MP सेल्फी कॅमेरा सारख्या गोष्टी उपलब्ध असतील, अशी अपेक्षा केली जात आहे. तुम्ही घरबसल्या Vivo V30e चे भारतीय लाँच LIVE पाहू शकता.

हे सुद्धा वाचा: Realme P1 Pro 5G फोनची Sale आजपासून भारतात सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स। Tech News

Vivo V30e इंडिया लाँच

आगामी Vivo V30e स्मार्टफोन भारतात लाँच होण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनी 2 मे रोजी एक इवेंट आयोजित करणार आहे, ज्यामध्ये हा फोन लाँच केला जाईल. हे लॉन्चिंग इव्हेंट दुपारी 12 वाजता सुरू होईल जो खाली दिलेल्या लिंकवर LIVE पाहता येईल. त्याबरोबरच, Vivo V30e लाँच Vivo India वेबसाइट, शॉपिंग साइट Flipkart आणि ब्रँडच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट स्ट्रीम केला जाईल.

Vivo V30e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Vivo V30e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स कंपनीच्या अधिकृत साईटवर आधीच लाईव्ह करण्यात आले आहेत. त्यानुसार, Vivo V30E कर्व डिस्प्लेवर लाँच केला जाईल. ही एक अल्ट्रा स्लिम 3D स्क्रीन असेल. त्याबरोबरच, कंपनीने कॅमेरा सेक्शनबद्दल देखील खुलासा केला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेराला सपोर्ट करेल. तसेच, यात 50MP चा पोर्ट्रेट कॅमेरा दिला जाईल, जो Sony IMX882 सेंसर असेल. तर, हा फोन 50MP फ्रंट कॅमेरासह लाँच केला जाईल. ही ऑटो फोकस लेन्स असेल, असे कंपनीने सांगितले.

Vivo V30e
Vivo V30e

पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5,500 mAh बॅटरी दिली जाईल. हा फोन 4 वर्षांच्या बॅटरी लाइफसह आणला जाईल. यासह, फोनच्या वापरकर्त्यांना दीर्घकाळ समर्थन देईल. याव्यतिरिक्त, आम्ही तुम्हाला सांगतो की, हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 1 octacore वर लॉन्च केला जाऊ शकतो. मात्र, फोनची किमंत आणि सर्व स्पेसिफिकेशन्स हा स्मार्टफोन लाँच झाल्यावरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo