OnePlus 6 च्या सर्व वेरिएन्ट्स वर मिळत आहे 2,000 रुपयांचा कॅशबॅक

OnePlus 6 च्या सर्व वेरिएन्ट्स वर मिळत आहे 2,000 रुपयांचा कॅशबॅक
HIGHLIGHTS

ही ऑफर फक्त HDFC कार्ड्स मधून केलेल्या EMI ट्रांजेक्शन वर उपलब्ध आहे.

2000 rupees cashback on OnePlus 6 all variants: OnePlus ने OnePlus 6 च्या सर्व वेरिएन्ट्स वर 2,000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला आहे. OnePlus 6 अमेजॉन वरून HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्ड ने EMI विकत घेतल्यास 2,000 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळत आहे. जे यूज़र्स डिवाइस oneplus.in आणि OnePlus एक्सक्लूसिव ऑफलाइन चॅनल्स ने विकत घेत आहेत त्यांना 2,000 रूपये कॅशबॅक च्या रुपात मिळतील, पण ही ऑफर फक्त HDFC कार्ड्स मधून केलेल्या EMI ट्रांजेक्शन वर उपलब्ध आहे. तसेच ग्राहक Amazon.in वरून सर्व बँक क्रेडिट कार्ड्स ने डिवाइस नो कॉस्ट EMI वर विकत घेऊ शकतात. 

हि डिस्काउंट ऑफर OnePlus 6 च्या सर्व वेरिएन्ट्स वर उपलब्ध आहे ज्यात रेड एडिशन पण सामिल आहे, हा डिवाइस 16 जुलै, 2018 पासून सेल साठी उपलब्ध होईल. OnePlus 6 Red Edition 16 जुलै ला अमेजॉन प्राइम डे सेल मध्ये 39,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. OnePlus 6 आधीपासून मिडनाईट ब्लॅक, मिरर ब्लॅक आणि सिल्क वाइट कलर मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. 

OnePlus 6 Red Edition मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज आहे. हा वेरिएंट यूजर्स 16 जुलै ला दुपारी 12 वाजता अमेजॉन वरून विकत घेऊ शकता. OnePlus 6 च्या स्पेसिफिकेशंस बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये एक 6.28-इंचाचा FHD+ 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाला डिस्प्ले आहे. हि एक AMOLED स्क्रीन आहे जिचे पिक्सेल रेजोल्यूशन 2280×1080 पिक्सेल आहे. याला स्लिम बॉडी डिजाइन देण्यात आली आहे. ग्लास बॅक डिवाइस च्या रेडियो ट्रांसमिशन ला वाढवते आणि स्क्रीन ला गोरिला ग्लास 5 ने प्रोटेक्शन देण्यात आले आहे. बॉक्स मध्ये तुम्हाला एक 3D नायलॉन केस पण मिळतो जो डस्ट आणि वॉटर प्रुफ आहे. 

फोन मध्ये एक ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 16-मेगापिक्सल च्या एका सेंसर व्यतिरिक्त 20-मेगापिक्सल च्या अजून एका सेंसर चा कॉम्बो आहे, याला 2X lossless झूम आणि पोर्ट्रेट मोड शॉट क्षमते सह सादर करण्यात आला आहे. तसेच या डिवाइस मध्ये एक 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण देण्यात आला आहे. OnePlus 6 मध्ये डिवाइस च्या बॅकला वर्टीकल डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि कॅमेरा सेटअप च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. 

इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर डिवाइस मध्ये 3300mAh ची बॅटरी आहे आणि हा डॅश चार्ज सपोर्ट सह येतो. तसेच हा डिवाइस वॉटर रेसिस्टेंट बनवण्यात आला आहे जो याला स्प्लॅश प्रुफ बनवतो आणि या डिवाइस मध्ये 3.5mm हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. OnePlus 6 एंड्राइड ओरियो वर आधारित कंपनी च्या ऑक्सीजन OS वर चालत आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo