मोठी बातमी: सर्वात हाईएस्ट स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह Lenovo चा हा फोन 14 जूनला होऊ शकतो लॉन्च

मोठी बातमी: सर्वात हाईएस्ट स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह Lenovo चा हा फोन 14 जूनला होऊ शकतो लॉन्च
HIGHLIGHTS

लेनोवो लवकरच आपल्या एका स्मार्टफोन सह येणार आहे, जो याआधी कधीही न पाहिलेल्या स्पेक्स आणि फीचर्स सह येईल.

Lenovo बद्दल बोलायचे तर चीन मधील ही एक प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनी ने काही दिवसांपूर्वी आपल्या Lenovo S5, Lenovo K5 आणि Lenovo K5 Lite ला लॉन्च केले होते. आता कंपनी चे VP Chang Cheng ने वेइबो वर एक टीजर जारी केला आहे, जो एका नवीन फोन कडे की ओर इशारा करत आहे. या टीजर वरून हे पण समोर येत आहे की कंपनी लवकरच आपला एक फ्लॅगशिप डिवाइस लॉन्च करू शकते. 
त्याचबरोबर असे पण समोर येत आहे की हा असा स्मार्टफोन असणार आहे, जो आता पर्यंतच्या सर्वात जास्त स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह लॉन्च केला जाईल. याचा अर्थ असा की या डिवाइस मध्ये असा डिस्प्ले असेल, जो इतर स्मार्टफोन मध्ये आपण बघितला देखील नाही. या वेइबो पोस्ट वरून हे पण समोर येत आहे की हा डिवाइस 14 जून ला लॉन्च केला जाईल. 
कंपनी चे VP Cheng यांच्या नुसार, फोन मध्ये कॅमेरा ची जागा खुप कमी करण्यात आली आहे, तसेच बेजल्स आणि एंटेना बँड इत्यादी पण कमी करण्यात आले आहेत. याचा अर्थ असा की यूजर्सना या फोन मध्ये एक मोठा डिस्प्ले मिळेल. या डिवाइस ची एक इमेज पण जारी करण्यात आली आहे, ज्यानुसार फोन मध्ये तुम्हाला सुपर स्लिम बेजल दिले जातील. तसेच डिवाइस मध्ये फ्रंट कॅमेरा ची जागा पण खुप कमी करण्यात आली आहे.  
या डिवाइस मध्ये Vivo Apex प्रमाणे एक फ्लिप-अप कॅमेरा पण वापरला जाऊ शकतो, कारण अजून पर्यंत काही अधिकृत रीत्या समोर आले नाही. 
कंपनी ने काही दिवसांपूर्वी लॉन्च केलेल्या Lenovo S5 स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर या डिवाइस ची सुरवाती किंमत CNY 999 म्हणजे जवळपास Rs. 10,300 आहे. ही किंमत स्मार्टफोन च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट ची आहे. तसेच याच्या 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट बद्दल बोलायचे तर याची किंमत CNY 1,199 म्हणजे जवळपास Rs. 12,400 आहे. त्याचबरोबर याच्या अजून एका मॉडल म्हणजे 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंट ची किंमत CNY 1,499 म्हणजे जवळपास Rs. 15,400 आहे. 
तसेच या स्मार्टफोन चे स्पेक्स पाहता तुम्हाला या स्मार्टफोन मध्ये एक 5.7-इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले 1080×2160 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळत आहे. त्याचबरोबर यात एक ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर पण मिळेल, ज्याचा क्लॉक स्पीड 2GHz आहे. वर सांगितल्याप्रमाणे फोन 3GB आणि 4GB रॅम वाल्या ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo