भारीच की ! WhatsApp वर एकाच वेळी पाठवता येतील तब्बल 100 फोटो, कसे ते पहा ?

HIGHLIGHTS

WhatsApp चे नवीन फीचर

एकाच वेळी 100 फोटो-व्हिडिओ पाठवा.

WhatsApp चे नवे फिचर केवळ नव्या वर्जनवर उपलब्ध

भारीच की ! WhatsApp वर एकाच वेळी पाठवता येतील तब्बल 100 फोटो, कसे ते पहा ?

WhatsApp ने आपल्या Android स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक उत्कृष्ट अपडेट आणले आहे, जे त्यांना एकाच वेळी 100 फोटो आणि व्हिडिओ पाठवण्याची परवानगी देते. आधी ही संख्या 30 होती म्हणजेच वापरकर्ते आधी एकाच वेळी 30 फोटो किंवा व्हिडिओ पाठवण्यास सक्षम होते. मात्र व्हॉट्सऍपने ही समस्या सोडविली आहे. चला तर मग बघुयात, तुम्हाला WhatsApp वर एकाच वेळी 100 फोटो कसे पाठवता येईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : अरे बापरे ! आता Facebook-Instagram वरही ब्लु टिकसाठी द्यावे लागतील पैसे

सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp चे नवीन वर्जन असणे आवश्यक आहे. त्यासाठी, Google Play Store वर जा. WhatsApp अपडेट करा. आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp च्या या फिचरसाठी तुम्हाला 2.22.24.73 वर्जन हवे.

खालील स्टेप्स फॉलो करा :

– प्रथम WhatsApp उघडा. मग ज्या व्यक्तीला इतके फोटो पाठवायचे आहेत त्याच्या चॅटवर जा.

–  आता, अटॅचमेंट आयकॉनवर टॅप करा.

–  त्यानंतर Gallery चा पर्याय निवडा.

– आता तुम्हाला 100 फोटो सिलेक्ट करावे लागतील जे तुम्हाला पाठवायचे आहेत. 

जर तुमचे WhatsApp वर्जन जुने असेल तर तुम्ही फक्त 30 फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकता. कंपनी हळूहळू हे फिचर सर्वांसाठी आणत आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo