अरे बापरे ! आता Facebook-Instagram वरही ब्लु टिकसाठी द्यावे लागतील पैसे

HIGHLIGHTS

Facebook-Instagram ब्लु टिकसाठी पेड सब्स्क्रिप्शन सुरु

यासाठी यूजर्सला $11.99 म्हणजेच सुमारे 990 रुपये मासिक शुल्क द्यावे लागेल.

कंपनीने मुख्यतः कंटेंट क्रिएटर्ससाठी सशुल्क सेवा सुरू केली आहे.

अरे बापरे ! आता Facebook-Instagram वरही ब्लु टिकसाठी द्यावे लागतील पैसे

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter सारखेच आता Meta ने देखील पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. फेसबुकच्या मूळ कंपनीने Meta Verified सशुल्क सेवा सुरू केली आहे. जर तुम्ही Facebook-Instagram वापरकर्ते असाल तर तुम्हाला ही सेवा खरेदी करताना अकाउंट व्हेरिफिकेशनची सुविधा मिळेल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO मार्क झुकरबर्ग यांनी ही सेवा सुरू केली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : 'या' 5 खास फीचर्ससह Vivo Y56 5G लाँच, पहा किंमत

मेटा सबस्क्रिप्शन प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, यासाठी यूजर्सला $11.99 म्हणजेच सुमारे 990 रुपये मासिक शुल्क द्यावे लागेल. तुम्ही हा प्लॅन iOS ऍप वरून खरेदी केल्यास, मासिक शुल्क $14.99 म्हणजेच सुमारे 1200 रुपये आहे. कंपनीने मुख्यतः कंटेंट क्रिएटर्ससाठी सशुल्क सेवा सुरू केली आहे. 

फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर व्हेरिफिकेशन बॅजसाठी वापरकर्त्यांना सरकारी दस्तऐवज आयडी द्यावा लागेल. या आठवड्याच्या शेवटी, सबस्क्रिप्शनची प्रथम चाचणी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये केली जाईल. यानंतर, इतर देशांसाठी हळूहळू सशुल्क सेवा सुरू केली जाईल. 

कोणते फीचर्स मिळतील ?

कंपनीच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, सबस्क्रिप्शन प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना व्हेरिफिकेशन बॅज, प्रोऍक्टिव्ह अकाउंट प्रोटेक्शन, अकाउंट सपोर्ट ऍक्सेस आणि जास्त व्हिजिबिलिटी आणि रिच यासारखी फीचर्स मिळतील. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी पेड सब्स्क्रिप्शन हा कमाईचा एक उत्तम मार्ग म्हणून उदयास आला आहे.

दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी स्वतंत्र पैसे खर्च करावे लागतील. 

 मार्क झुकरबर्ग यांनी इंस्टाग्राम चॅनलद्वारे नवीन प्रोडक्टची घोषणा केली. कंपनीने गेल्या आठवड्यात ही सेवा सुरू केली. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरकर्ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात, परंतु त्यांना स्वतंत्र सदस्यता घ्यावी लागेल. मेटापूर्वी ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन आणि स्नॅपचॅट प्लस सारख्या सशुल्क सदस्यता प्लॅन्स देखील लाँच झाले आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo