Xiaomi ने भारतात लाँच केले 65 इंचपर्यंत नवे Smart TV! किंमत 30 हजारांपेक्षा कमी, काय मिळेल विशेष? 

HIGHLIGHTS

Xiaomi india ने 2025 साठी त्यांचा QLED TV X Pro अपग्रेड केला आहे.

हे नवे टीव्ही भारतात 43-इंच, 55-इंच आणि 65-इंच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.

Xiaomi QLED TV X Pro 2025 टीव्हीची विक्री 16 एप्रिलपासून सुरु होईल.

Xiaomi ने भारतात लाँच केले 65 इंचपर्यंत नवे Smart TV! किंमत 30 हजारांपेक्षा कमी, काय मिळेल विशेष? 

प्रसिद्ध टेक दिग्गज Xiaomi india ने 2025 साठी त्यांचा QLED TV X Pro अपग्रेड केला आहे. हे नवे Smart TV भारतात 43-इंच, 55-इंच आणि 65-इंच व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला अनेक आकर्षक फीचर्स मिळतील. यामध्ये तुम्हाला DLG 120Hz रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन, पॅचवॉल UI आणि इतर अनेक नवीनतम फीचर्स मिळतील. या नव्या Xiaomi टीव्हीची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: नव्या Lumio ने लाँच केले नवे मोठे Smart TV! किंमत फक्त 30,000 रुपयांपासून सुरु

Xiaomi QLED TV X Pro 2025 ची किंमत

Xiaomi QLED TV X Pro 2025 ची सुरुवातीची किंमत 31,999 रुपये इतकी आहे. ही टीव्हीच्या 43-इंच मॉडेलसाठी निश्चित केली गेली आहे. मात्र, सुरुवातीला लाँच ऑफरसह ग्राहक हा टीव्ही 29,999 रुपयांमध्ये खरेदी करण्यास सक्षम असतील. जर त्यांनी HDFC डेबिट/क्रेडिट कार्ड EMI पर्याय वापरला तर 2000 रुपयांची सूट मिळेल.

SMART TV: Xiaomi QLED TV X Pro 2025

त्याबरोबरच, 55 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 44,999 रुपये इतकी आहे. तर, टीव्हीच्या 65 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 64,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. या टीव्हीची विक्री 16 एप्रिलपासून सुरु होईल.

Xiaomi QLED TV X Pro 2025 चे तपशील

Xiaomi TV X Pro 2025 मध्ये एक 4K QLED पॅनेल देण्यात आला आहे, जो डॉल्बी व्हिजन, HDR10+ आणि विविड पिक्चर इंजिनसह येतो. 43, 55, 65 इंच स्क्रीनच्या तिन्ही मॉडेल्समध्ये DLG 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आहे, जो कंटेंटनुसार रिफ्रेश रेट आपोआप ऍडजस्ट करेल. साउंडसाठी, टीव्हीमध्ये 30W चे स्पीकर्स आहेत, तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 55 आणि 65 इंच लांबीच्या 34W चे स्पीकर्स आहेत. त्याबरोबरच, ऑडिओ तंत्रज्ञानामध्ये डॉल्बी ऑडिओ, DTS: X आणि शाओमी साउंडचा सपोर्ट आहे.

या टीव्हीला गुगल टीव्हीसह शाओमीचा स्वतःचा पॅचवॉल UI मिळतो. त्याबरोबरच, Xiaomi TV+ द्वारे मोफत लाइव्ह चॅनेल, युनिव्हर्सल सर्च, किड्स मोड आणि पॅरेंटल लॉक सारखी फीचर्स देखील समाविष्ट आहेत. शाओमीने रेमोतमद्ये नमपॅड, पॅचवॉल बटण म्हणजे जास्त वेळ दाबून ठेवल्याने सेटिंग्ज उघडतात असे बटन आणि गुगल व्हॉइस असिस्टंटचा सपोर्ट दिला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo