नव्या Lumio ने लाँच केले नवे मोठे Smart TV! किंमत फक्त 30,000 रुपयांपासून सुरु
Lumio ने भारतात त्यांचे पहिले स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत.
नवे टीव्ही Lumio Vision 9 आणि Lumio Vision 7 या नावांनी लाँच
23 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना Lumio कडून 3 वर्षांची वॉरंटी
Lumio ने भारतात त्यांचे पहिले Smart tv लाँच केले आहेत. लक्षात घ्या की, हे टीव्ही Lumio Vision 9 आणि Lumio Vision 7 या नावांनी लाँच करण्यात आले आहेत. त्याबरोबरच, हे दोन्ही टीव्ही प्रीमियम व्हिज्युअल आणि ऑडिओ एक्सपेरिअन्ससह येतात. त्यामध्ये डॉल्बी व्हिजन सपोर्ट आहे, जो उत्तम पिक्चर कॉलिटी सुनिश्चित करतो. ऑडिओसाठी, यात डॉल्बी ATMOS आधारित क्वाड-स्पीकर प्रदान केले आहेत, जे इमर्सिव्ह साउंड एक्सपेरियन्स देतील.
SurveyAlso Read: Smartphones Launch This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार जबरदस्त फोन्स, एकापेक्षा एक पर्याय
महत्त्वाचे लक्षात घ्या की, Lumio हा Xiaomi आणि Flipakrt च्या माजी दिग्गजांनी सुरू केलेला एक नवीन ब्रँड आहे. जाणून घेऊयात नव्या स्मार्ट टीव्हीची किंमत-
Lumio Vision 9 आणि Lumio Vision 7 ची किंमत
भारतात, Lumio Vision 9 फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही 55 इंच लांबीच्या मॉडेलसह येतो. या टीव्हीची किंमत 59,999 रुपये इतकी आहे. त्याचप्रमाणे, Lumio Vision 7 टीव्ही तीन वेगवेगळ्या आकारात सादर करण्यात आला आहे. TV च्या 43 इंचाच्या व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये, 50 इंच लांबीच्या व्हेरिएंटची किंमत 34,999 रुपये आणि 55 इंच लांबीच्या मॉडेलची किंमत 39,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे सर्व टीव्ही 23 एप्रिल 2025 पासून Amazon India वर उपलब्ध असतील. 23 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना Lumio कडून 3 वर्षांची वॉरंटी मिळेल. तसेच, यामध्ये 2 वर्षांची व्यापक वॉरंटी आणि 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी समाविष्ट आहे. ही ऑफर TV च्या दोन्ही मॉडेलवर उपलब्ध आहे.
Lumio Vision 9
डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, यात एक मिनी LED स्क्रीन आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 900 निट्स आहे. यात डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे पिक्चर कॉलिटी आणखी चांगली होते. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा टीव्ही Google TV OS वर चालतो, जो 10,000 हून अधिक ऍप्स आणि 4 लाखांहून अधिक चित्रपट आणि शोचा ऍक्सेस देतो. त्याबरोबरच, यात गुगल कास्ट, व्हर्च्युअल रिमोट, गुगल फोटोज स्क्रीनसेव्हर, जेमिनी AI, मूव्ही समरी, कस्टम AI वॉलपेपर सारखी फीचर्स आहेत.
याव्यतिरिक्त, TV सोबत येणाऱ्या मिनियन रिमोटमध्ये TLDR आणि इतर OTT हॉटकीजसाठी एक डेडिकेटेड बटन आहे. ऑडिओसाठी, व्हिजन 9 मध्ये क्वाड-स्पीकर सेटअप आहे. यात डॉल्बी ATMOS चाही समावेश आहे, जो एक इमर्सिव्ह साउंड एक्सपेरियन्स देतो. कनेक्टिव्हिटीसाठी, यात 3 HDMI पोर्ट, 3 USB पोर्ट, ऑप्टिकल ऑडिओ आउटपुट आणि Wi-Fi असे पर्याय आहेत.

Lumio Vision 7
Lumio Vision 7 मध्ये वरील टीव्हीपेक्षा केवळ डिस्प्लेच्या टेक्नॉलॉजीचा फरक आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिजन 7 मध्ये QLED स्क्रीन आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस 400 निट्स आहे. यात डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील आहे, ज्यामुळे कलर आणि कॉन्ट्रास्ट आकर्षक दिसतात. महत्त्वाचे लक्षात घ्या की, डिस्प्ले व्यतिरिक्त प्रोसेसर, रॅम, स्टोरेज, ऑडिओ सेटअप, गुगल टीव्ही इंटरफेस, टीएलडीआर ऍप आणि कनेक्टिव्हिटी पर्याय यासारखे इतर सर्व वरील व्हिजन 9 प्रमाणेच आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile