Holi Special Sale: होळीचा सण आता अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त सर्व कंपन्या आपल्या प्रोडक्ट्सवर सेलचे आयोजन करत आहेत. अशात प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर भारी सेल सुरु आहे. या सेलदरम्यान अनेक महागड्या टेक गॅजेट्सवर मोठ्या प्रमाणात सवलती मिळत आहेत. तुम्हाला स्मार्टफोन्स, इयरबड्स इ. वर अनेक उत्तम ऑफर्स मिळतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Flipkart सेलमधील ऑफर्स-
प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart वर सध्या होळीच्या पार्श्वभूमीवर Flipkart बिग बचत डेज सेल सुरू झाला आहे. या 14 मार्च पर्यंत सुरु असणाऱ्या सेलदरम्यान अनेक प्रोडक्ट्सवर चांगल्या ऑफर्स आणि उत्तम सवलती मिळत आहेत. सेलदरम्यान मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फ्लिपकार्टवरील या सेल दरम्यान तुम्हाला PNB कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला 10% त्वरित सूट मिळणार आहे.
गॅजेट्सवरील डील्स
फ्लिपकार्टच्या होळी स्पेशल सेलमध्ये प्रसिद्ध टेक जायंट Apple च्या iPhones वरही मोठ्या प्रमाणात सवलती मिळत आहेत. नुकतेच लाँच झालेल्या iPhone 16e वर मोठ्या प्रमाणात सूट समाविष्ट आहे. याशिवाय, ऑफरमध्ये Samsung, Vivo, Nothing आणि IQOO अँड्रॉइड हँडसेट देखील खरेदी करता येतील. Samsung ने अलीकडेच Samsung Galaxy S25 सिरीज भारतीय बाजारात लाँच केला आहे. तसेच, Vivo ने देखील नुकतेच आपला नवा Vivo V50 स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे.
याशिवाय, स्मार्टवॉच देखील आकर्षक सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. या सेलदरम्यान तुम्ही स्मार्टफोन आणि स्मार्टवॉचवरच नाही तर, इअरबड्सवर देखील चांगली सूट मिळवण्यास सक्षम असाल. या इअरबड्सवर 100 हून अधिक पर्याय मिळत आहेत. या बड्सची सुरुवातीची किंमत 699 रुपये आहे. या काळात तुम्ही स्वस्त दरात नवा हँडसेट, नवी स्मार्टवॉच, नवे इयरबड्स इ. महागडी उपकरणे स्वस्त खरेदी करू शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile