BSNL Holi Special: स्वस्तात वर्षभरासाठी होईल गर्लफ्रेंडसोबत Unlimited कॉलिंग आणि चॅटिंगची सोय, लिमिटेड टाइम डील!
BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन होळी ऑफर सादर केली आहे.
BSNL ने ही ऑफर 1,499 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह सादर केली आहे.
होळी ऑफर अंतर्गत आता या BSNL प्लॅनचे फायदे वाढवण्यात आले आहेत.
BSNL Holi Special: भारतातील एकमेवा टेलिकॉम कंपनीने BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन होळी ऑफर सादर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, कंपनीने ही ऑफर त्यांच्या सध्याच्या BSNL 1,499 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह सादर केला आहे. लक्षात घ्या की, ही कंपनीची दीर्घकालीन वैधतेसह येणारा प्लॅन आहे. आतापर्यंत ग्राहकांना या प्लॅनमध्ये 336 दिवसांची वैधता मिळत होती. मात्र, होळी ऑफर अंतर्गत आता या प्लॅनचे फायदे वाढवण्यात आले आहेत. यासह तुम्ही अगदी स्वस्तात वर्षभरासाठी तुमच्या गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडसह आरामात कनेक्टेड राहू शकता.
SurveyBSNL Holi Special Offer
BSNL ने त्यांच्या अधिकृत X हँडलवर स्पेशल होळी ऑफरची माहिती दिली आहे. वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने 1,499 रुपयांच्या प्लॅनसह होळी ऑफर सादर केली आहे. या प्लॅनची वैधता आधी 336 दिवस इतकी आहे. मात्र, ऑफरअंतर्गत या प्लॅनवर 29 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार आहे. त्यानुसार, या प्लॅनसह तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळेल. लक्षात घ्या की, BSNL ची ही ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत वैध असेल.

BSNL चा 1,499 रुपयांचा प्लॅन
BSNL च्या 1,499 रुपयांच्या प्लॅन बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, लक्षात घ्या की, हा कंपनीचा डेटा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 24GB इंटरनेट डेटाचा लाभ मिळतो. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, या प्लॅनअंतर्गत तुम्हाला दररोज 100SMS ची देखील सुविधा मिळेल.
2,399 रुपयांच्या प्लॅनवर होळी ऑफर
BSNL ने 2,399 रुपयांच्या प्लॅनवर देखील होळीची विशेष ऑफर सादर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ऑफर अंतर्गत, वरील प्लॅनप्रमाणे वापरकर्त्यांना वाढीव वैधता ऑफर केली आत आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, याआधी हा प्लॅन 395 दिवसांच्या वैधतेसह येत होता. मात्र, होळी ऑफर अंतर्गत आता हा प्लॅन 425 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्ये 60GB अतिरिक्त डेटा ऑफर केला जातो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile