मोठी बातमी! भारत सरकारने केली मोठी कारवाई, तब्बल 100 हुन अधिक Apps बॅन, काय आहे कारण? 

HIGHLIGHTS

गुगल प्ले स्टोअरला 119 परदेशी Apps ब्लॉक करण्याचे आदेश

सरकारने 2020 साली देखील अनेक चिनी ऍप्स बॅन केले होते.

कलम 69A अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकणाऱ्या कंटेंट किंवा प्लॅटफॉर्मना ब्लॉक करण्याचा अधिकार

मोठी बातमी! भारत सरकारने केली मोठी कारवाई, तब्बल 100 हुन अधिक Apps बॅन, काय आहे कारण? 

भारत सरकारने गुगल प्ले स्टोअरला 119 परदेशी Apps ब्लॉक करण्याचे आदेश जारी केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, यापैकी बहुतेक व्हिडिओ आणि व्हॉइस चॅट ऍप्स आहेत. महत्त्वाचे लक्षात घ्या की, हे ऍप्स चीन आणि हाँगकाँगशी कनेक्टेड आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत या संदर्भात आदेश जारी केले.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

सविस्तर सांगायचे झाल्यास, हे कलम सरकारला राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकणाऱ्या अशा कंटेंट किंवा प्लॅटफॉर्मना ब्लॉक करण्याचा अधिकार देते. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, सरकारने 2020 साली देखील चिनी ऍप्स बॅन केले होते. त्यानंतर, आता सरकारने एवढी मोठी कारवाई केली आहे.

गुगल प्ले स्टोअरला 119 परदेशी Apps ब्लॉक करण्याचे आदेश

Also Read: Apple iPhone 16e दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता

परदेशी ऍप्स ब्लॉक

लक्षात घ्या की, सरकारने Google Play स्टोअरला सिंगापूर, अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांशी जुळलेले ऍप्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 119 पैकी फक्त 15 ऍप्स Google Play Store वरून हटवण्यात आले आहेत. ब्लॉक केलेल्या अ‍ॅप्समध्ये हनीकॅम आणि चिलचॅट यांचा समावेश आहे. तर उर्वरित ऍप्स अजूनही डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, यापैकी काही ऍप्सच्या डेव्हलपर्सनी म्हटले आहे की, त्यांना गुगलने याबद्दल माहिती दिलेली आहे. तसेच, ते ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारसोबत काम करण्यास तयार आहेत. यासंदर्भात त्यांना अधिक स्पष्टीकरण अपेक्षित आहे. कारण या नव्या आदेशाचा त्यांचा व्यवसायांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

2020 मध्ये केली होती कारवाई

वर सांगितल्याप्रमाणे, भारत सरकारने 2020 साली देखील चिनी ऍप्स बॅन केले होते. 2020 म्हणजेच कोरोना कालावधीत चीनसोबतचा तणाव वाढल्यानंतर भारत सरकारने चिनी ऍप्स विरुद्ध कठोर कारवाई केली होती. होय, सरकारने वेगवेगळ्या प्रसंगी आदेश जारी करून 100 हून अधिक चिनी ऍप्स ब्लॉक केले होते. यात टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि पबजी सारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश होता. मात्र, यापैकी काही आता सक्रिय आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo