Apple iPhone 16e दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता 

HIGHLIGHTS

Apple ने अखेर भारतात दीर्घकाळ चर्चेत असलेला iPhone 16e लाँच केला आहे.

कंपनीच्या नवीनतम तंत्रज्ञानाने Apple Intelligence सुसज्ज आहे.

या डिव्हाइसची प्री-बुकिंग 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल.

Apple iPhone 16e दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि उपलब्धता 

लोकप्रिय अमेरिकन टेक दिग्गज Apple ने अखेर भारतात दीर्घकाळ चर्चेत असलेला iPhone 16e लाँच केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा iPhone 16 सिरीज अंतर्गत येणारा नवीन स्मार्टफोन आहे, जो कंपनीच्या नवीनतम तंत्रज्ञानाने Apple Intelligence सुसज्ज आहे. या फोनमध्ये तुम्हाला अनेक पॉवरफुल फीचर्स मिळतील. याशिवाय, फोटो काढण्यासाठी हँडसेटमध्ये 48MP चा सिंगल रियर कॅमेरा आहे. तसेच, पूर्ण चार्जसह ही बॅटरी 24 तासांपेक्षा जास्त काळ टिकेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Apple iPhone 16e ची किंमत-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: TCL Big Screen TV: घरातच येईल थिएटरचा फील! 75 इंचपर्यंत टीव्ही निम्म्याहून कमी किमतीत उपलब्ध

Apple iPhone 16e ची किंमत आणि उपलब्धता

Apple चा iPhone 16e भारतात 128GB, 256GB आणि 512GB अशा 3 स्टोरेज ऑप्शन्समध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्हेरिएंट्सच्या किमती अनुक्रमे 59,900 रुपये, 69,900 रुपये आणि 89,900 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. या डिव्हाइसची प्री-बुकिंग 21 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. तर, या फोनची 28 फेब्रुवारी 2025 पासून खरेदी करता येईल.

iphone 16e launched in india

iPhone 16e चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Apple चा नवीन स्मार्टफोनमध्ये 6.1-इंच लांबीचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. संरक्षणासाठी त्यावर सिरेमिक शील्ड बसवण्यात आले आहे. उत्तम परफॉर्मन्स आणि स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये अ‍ॅक्शन बटण आणि A18 चिपसेट देण्यात आला आहे. iPhone 16e नवीनतम iOS 18 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. त्याबरोबरच, या फोनला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग मिळाले आहे.

फोटोग्राफीसाठी, नवीन हँडसेटच्या मागील बाजूस 48MP कॅमेरा देण्यात आला आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन OIS ला सपोर्ट करतो. याद्वारे, व्हिडिओ HDR स्वरूपात रेकॉर्ड केला जाऊ शकतो. तर, आकर्षक सेल्फी क्लिक करणे आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 12MP कॅमेरा उपलब्ध आहे. मध्ये बिल्ट-इन रिचार्जेबल लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी पूर्ण चार्ज केल्यानंतर 26 तास चालते. कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये Wi-Fi, ई-सिम, फिजिकल सिम स्लॉट, ब्लूटूथ, NFC, GPS आणि USB टाइप-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo