Valentine’s Day 2025: थिएटर आणि OTT वर जबरदस्त चित्रपट आणि सिरीज होणार रिलीज, व्हॅलेंटाईन बनेल खास!
व्हॅलेंटाईन डे ला अनेक चित्रपट आणि सिरीज होणार रिलीज
थिएटरसह Netflix, Amazon वर नवीन सिरीज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.
'छावा' हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र, छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ऐतिहासिक चित्रपट आहे.
Valentines Day 2025: प्रेक्षक आणि सिनेरसिकांसाठी या Valentine’s Day खूप खास होणार आहे. कारण, थिएटर्स आणि OTT प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या अनेक बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपट आणि सिरीजसह रोमान्स, ड्रामा आणि उत्साहाचा एक डोस देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, चित्रपटगृहात ‘छावा’ पासून ते ‘बॉबी और ऋषी की लव्ह स्टोरी’ पर्यंत Netflix, Amazon वर नवीन सिरीज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत. यासह व्हॅलेंटाईन डे 2025 सर्व सिनेरसिकांसाठी एक मेजवानीच ठरणार आहे. प्रेमाच्या या सिझनमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट आणि सिरीजची यादी पहा-
SurveyAlso Read: Crime Beat Trailer: सई ताम्हणकरच्या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज! या सीनची होतेय सर्वाधिक चर्चा
Chhaava
सध्या बॉलीवूडमध्ये छावा चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, छावा 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘छावा’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर पुत्र, छत्रपती संभाजी महाराज यांची कहाणी जिवंत करणारे एक ऐतिहासिक चित्रपट आहे. या भारदस्त चित्रपटात संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विकी कौशल आणि त्यांच्या पत्नी येसूबाई भोंसलेच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत.
Dhoom Dhaam
Dhoom Dhaam हा चित्रपट बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता प्रतीक गांधी यांचा अॅक्शनने परिपूर्ण चित्रपट ‘धूम धाम’ रिलीज होणार आहे. लक्षात घ्या की, हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 पासून प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. ‘धूम धाम’ची कथा वीर खुराना आणि कोयल चड्डा यांच्याभोवती फिरते. हे दोघेही लग्न जुळत नसलेले व्यक्ती आहेत, यानंतर त्यांचे लग्न जुळते. ऍक्शनने भरलेली ही प्रेमकहाणी पाहण्यात मज्जा येणार आहे.
Pyaar Testing
व्हॅलेंटाईन डे आहे आणि रोमँटिक काही नाही, असे कधी होईल का? प्यार टेस्टिंग ही एक विचित्र रोमँटिक कॉमेडी आहे, जी आधुनिक नातेसंबंधांमधील अप-डाउन्समध्ये आहे. यामध्ये ध्रुव आणि अमृता एकमेकांना भावी जोडीदार म्हणून पाहतात. त्यांच्यातील सुसंगतता तपासण्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. दोघे एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ‘प्यार टेस्टिंग’ 14 फेब्रुवारी 2025 पासून Zee5 वर पाहण्यास उपलब्ध असेल.
Nakhrewaalii
नखरेवाली हा एक आगामी बॉलीवूड रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. जो प्रेम आणि नातेसंबंधांवर एक नवीन वळण देणारा आहे ज्यामध्ये एका विचित्र वळणाचा समावेश आहे. कलाकारांबद्दल बोलायचे झाल्यास, अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट व्हॅलेंटाईन डेला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज झा आहे. तुम्ही 14 फेब्रुवारी रोजी तुमच्या प्रेमासोबत दर्जेदार वेळ घालवू शकता. या नव्या चित्रपटासह तुमचा व्हॅलेंटाईन डे बनेल खास!
Pyaar Ka Professor
प्यार का प्रोफेसर सिरीज एका प्राध्यापकाच्या आकर्षक कथेवर आधारित आहे, ज्याला शैक्षणिक जीवनातील अडचणींमधून जाताना अनपेक्षितपणे प्रेम मिळते. ‘प्यार का प्रोफेसर’ 14 फेब्रुवारी 2025 पासून Amazon MX Player वर स्ट्रीम होईल. ‘प्यार का प्रोफेसर’ ही अक्षय चौबे दिग्दर्शित एक रोमँटिक ड्रामा सिरीज आहे, ज्यामध्ये प्रणव सचदेव आणि संदीपा धर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात महेश बलराज, अलिशा चोप्रा, बबला कोचर, हनीफ मेमन आणि इतर अनेक सहाय्यक कलाकार आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile