Crime Beat Trailer: सई ताम्हणकरच्या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज! या सीनची होतेय सर्वाधिक चर्चा

HIGHLIGHTS

नवी वेब सिरीज Crime Beat चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

ट्रेलरमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बोल्ड अंदाजात दिसत आहे.

ही सिरीज प्रसिद्ध OTT प्लेटफॉर्म Zee5 वर येत्या 21 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

Crime Beat Trailer: सई ताम्हणकरच्या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज! या सीनची होतेय सर्वाधिक चर्चा

Crime Beat Trailer: आपणा सर्वांना माहितीच आहे की, देशभर आणि जगभरातील गुन्हेगारी आणि संबंधित बातम्या कव्हर करणाऱ्या बातम्या पथकांना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अनेकदा असेही होते की, गुन्हेगारीचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो. ‘क्राइम बीट’ ही अशीच एक सिरीज आहे ज्याचा ट्रेलर लोकांना खूप आवडतोय. ज्यामध्ये गुन्ह्याच्या तळाशी जाणे ही पत्रकारासाठी जीवन आणि मृत्यूमधील कहाणी बनत आहे. ही सिरीज प्रसिद्ध OTT प्लेटफॉर्म Zee5 वर येत्या 21 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Good News! रिलायन्स Jio चा लोकप्रिय प्लॅन झाला स्वस्त, जबरदस्त बेनिफिट्ससह OTT सबस्क्रिप्शन Free

Crime Beat ट्रेलर

नव्या ‘क्राइम बीट’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये साकिब सलीम एका नवीन गुन्हेगारी पत्रकाराची भूमिका साकारत आहे. संजीव कौल आणि सुधीर मिश्रा यांनी मिळून त्याची कथा लिहिली आहे आणि दिग्दर्शनही केले आहे. साकिब सलीम व्यतिरिक्त, या मालिकेत सबा आझाद, राहुल भट्ट, सई ताम्हणकर, दानिश हुसेन आणि राजेश तैलंग सारखे अनेक कलाकार आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये सई आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे. तसेच, काही बोल्ड सीन देखील या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्याबरोबरच, प्रसिद्ध मराठी अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील तडफदार पोलिसाच्या भूमिकेत आहे.

या सिरीजमधील मुख्य पात्र साकिब सलीम म्हणजेच अभिषेक सिन्हा आहे, जो एका मोठ्या मीडिया संस्थेत रिपोर्टरची भूमिका साकारताना दिसतो. तो पोलिसांच्या गैरवर्तनाविरुद्ध आवाज उठवतो. यासह तो पत्रकारितेची ताकद बाहेर काढू इच्छितो. मात्र, अभिषेकच्या ऑफिसची अवस्था इतर कॉर्पोरेट ऑफिसांसारखीच आहे. या कार्यालयात, सबा आझादसह सर्वजण पदोन्नती मिळविण्यासाठी स्पर्धा करतात. अभिषेकही त्याच शोधात असतो आणि त्याला एक खळबळजनक प्रकरण समोर येतो.

Crime Beat Trailer (image credit: X)

या प्रकरणाच्या तळाशी जाणे या पत्रकारासाठी धोकादायक ठरते. आता तो हे प्रकरण सोडवू शकतो की नाही किंवा तो या गुन्हेगारांसमोर शरण जातो की नाही, ही मालिका या रहस्यांची उलगडा करणार आहे. या सिरीजच्या ट्रेलरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. चाहते आणि प्रेक्षक या सिरीजच्या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo