Samsung Galaxy Unpacked 2025: इव्हेंटदरम्यान Samsung Galaxy S25 सिरीजसह ‘ही’ उपकरणे होतील लाँच, पहा डिटेल्स
Samsung आज 22 जानेवारी 2025 रोजी Samsung Galaxy Unpacked 2025 इव्हेंट आयोजित करणार
या इव्हेंटमध्ये नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप सीरीज Samsung Galaxy S25 सीरीज लाँच करणार
कंपनी या इव्हेंटमध्ये Samsung XR हेडसेट लाँच करेल.
अखेर प्रतीक्षा Samsung लव्हर्सची प्रतीक्षा संपत आली आहे. कारण, Samsung आज 22 जानेवारी 2025 रोजी आपला बहुप्रतिक्षित Galaxy Unpacked 2025 इव्हेंट आयोजित करणार आहे. आपणा सर्वांना माहितीच आहे की, या इव्हेंटद्वारे कंपनी आपली नेक्स्ट जनरेशन फ्लॅगशिप सीरीज Samsung Galaxy S25 सीरीज लाँच करणार आहे. त्याबरोबरच, कंपनी या इव्हेंटमध्ये इतर अनेक उपकरणे देखील सादर करू शकतात. ताज्या लीकनुसार, कंपनी या इव्हेंटमध्ये Samsung XR हेडसेट लाँच करेल, अशी शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. जाणून घेऊयात सविस्तर-
Survey
Samsung XR हेडसेट
वर सांगितल्याप्रमाणे, ताज्या लीकनुसार कंपनी Samsung Galaxy Unpacked 2025 इव्हेंट अंतर्गत एक नवीन उपकरण ‘Samsung XR हेडसेट’ सादर करू शकते. सविस्तरपणे बोलायचे झल्यास, या गॅजेटमध्ये सॅमसंग XR आहे, जे सध्या ‘प्रोजेक्ट मोहन’ अंतर्गत विकसित केले जात आहे. याला कोरियनमध्ये ‘अनंत’ असे संबोधले जाते, ज्याबद्दलची माहिती डिसेंबर 2024 मध्ये म्हणजेच मागील महिन्यात उघड झाली. हे नवे सॅमसंग उपकरण बाजारात Apple Vision Pro ला टक्कर देणार आहे, अशा चर्चा सुरु आहेत.
जगप्रसिद्ध टेक जायंट Apple कंपनीने आधीच Apple Vision Pro हेडसेट बाजारात सादर केले आहेत. यासोबतच मेटा क्वेस्ट 3 देखील बाजारात आहे. Samsung चा नवीन हेडसेट गुगलच्या अनेक AI फीचर्सने सुसज्ज असू शकतो. यात गुगल क्रोमद्वारे वेब ब्राउझिंग, गुगल मॅपद्वारे व्ह्यू एक्सप्लोर करणे आणि थेट ट्रान्सलेशन करणे यासारख्या अनेक फीचर्सचा समावेश आहे.

तुमच्या माहितीसाठी सांगतो की, Google ने डिसेंबर 2024 मध्ये Android XR ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले होते. यावेळी, Samsung XR हेडसेट प्रथमच सादर करण्यात आला. नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारे हे पहिले उपकरण असेल. हा हेडसेट गुगल आणि क्वालकॉमच्या भागीदारीत विकसित केला जात आहे. जे ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी आणि मिक्स्ड रिॲलिटी यांचे मिश्रण असेल, असे सांगितले जात आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile