TRAI New Rules: फक्त 20 रुपयांमध्ये तब्बल 4 महिने सक्रिय राहील तुमचे SIM कार्ड, ग्राहकांना मोठा दिलासा! 

HIGHLIGHTS

TRAI ने सिम कार्डसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

Jio, Airtel, Vi आणि BSNL चे सिम कार्ड रिचार्ज न करता दीर्घकाळ सक्रिय राहण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

TRAI च्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज टाळण्यास मोठी मदत होईल.

TRAI New Rules: फक्त 20 रुपयांमध्ये तब्बल 4 महिने सक्रिय राहील तुमचे SIM कार्ड, ग्राहकांना मोठा दिलासा! 

TRAI New Rules: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने सिम कार्डसाठी नवीन नियम लागू केले आहेत. ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, आता लोक फक्त 20 रुपये देऊन त्यांचे सिम अनेक महिन्यांपर्यंत ॲक्टिव्ह ठेवू शकतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, सध्या रिचार्ज पॅक खूपच महाग झाले आहेत. ज्या युजर्सकडे एकापेक्षा जास्त सिम आहेत, ते ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी तुम्हाला अधिक खर्च करावा लागतो. मात्र, आता TRAI च्या नवीन नियमांनंतर युजर्सना दुसरे सिम अगदी कमी पैशात ॲक्टिव्ह ठेवण्याची सुविधा देण्यात आली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!
TRAI NEW RULES

Jio, Airtel आणि Vi युजर्सना मोठा दिलासा

TRAI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, Jio, Airtel, Vi आणि BSNL चे सिम कार्ड रिचार्ज न करता दीर्घकाळ सक्रिय राहण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ट्रायच्या या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे वापरकर्त्यांना वारंवार रिचार्ज टाळण्यास आणि खर्च कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. Jio सिम वापरकर्त्यांसाठी, आता सिम कोणत्याही रिचार्जशिवाय तब्बल 90 दिवसांसाठी सक्रिय राहील. त्यानंतर, युजर्सना रीएक्टिव्हेशन प्लॅनसह रिचार्ज करावे लागेल.

एवढेच नाही तर, तुमच्या नंबरवर 20 रुपये प्रीपेड बॅलेन्स असल्यास, TRAI ते कपात करेल आणि तुम्हाला 30 दिवसांची अतिरिक्त वैधता देईल. यासह तुम्ही रिचार्ज न करता तब्बल 120 दिवसांसाठी सिम सक्रिय ठेवण्यास सक्षम आहात. यानंतरही, ही वैधता पूर्ण झाल्यांनतर, TRAI वापरकर्त्यांना 15 दिवसांचा वेळ देणार आहे, जेणेकरून ते सिम पुन्हा सक्रिय करण्यासाठी रिचार्ज करू शकतील. त्यानंतर रिचार्ज न केल्यास तुमचे नंबर बंद केले जाईल.

रिचार्ज खरेदी करण्यासाठी क्लिक करा!

Jio, Airtel आणि VI प्लॅन्सच्या किमतीतील वाढ

TRAI NEW RULES

जुलै 2024 मध्ये म्हणजेच मागील वर्षी प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या JIO, AIRTEL आणि VODAFONE IDEA ने आपल्या रिचार्ज प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली. रिचार्ज प्लॅन्समधील या दरवाढीनंतर सर्व कंपन्यांच्या युजर्सना महागाईचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे, अधिकतर भारतातील एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे वळले. ज्या ग्राहकांकडे दोन सिम कार्ड आहेत, त्यांच्यासाठी दोन्ही नंबर ऍक्टिव्ह करणे, खर्चिक झाले आहे. TRAI चा हा निर्णय युजर्ससाठी मोठा दिलासा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo