Security साठी एक पाउल पुढे! WhatsApp च्या Upcoming फिचरसह सिक्रेट कोडने चॅट अनलॉक करा। Tech News

HIGHLIGHTS

WhatsApp एका अप्रतिम फिचरवर काम करत आहे.

नव्या फिचरसह लॉक केलेल्या चॅट्स एका सिक्रेट कोडद्वारे उघडता येतील.

लॉक केलेल्या चॅट नेहमी चॅट सेक्शनमध्ये टॉपवर असलेल्या 'Locked Chat' मध्ये दिसतात.

Security साठी एक पाउल पुढे! WhatsApp च्या Upcoming फिचरसह सिक्रेट कोडने चॅट अनलॉक करा। Tech News

WhatsApp आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप आपला ग्राहकांच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेची काळजी घेतो. ऍपने अलीकडेच चॅट लॉक फिचर युजर्ससाठी रोलआऊट केले आहे. वापरकर्त्यांचा डेटा आणि वैयक्तिक चॅट चुकीच्या हातात पडण्यापासून रोखण्यासाठी ते नवीन फिचर जोडणार आहे. संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे बघा:

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!
whatsapp
WhatsApp

ताज्या अहवालानुसार, आता मेटा-मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग ऍप एका फिचरवर काम करत आहे, ज्यामुळे लॉक केलेल्या चॅट्स एका सिक्रेट कोडद्वारे उघडता येतील. याद्वारे एखाद्याला तुमच्या फोनचा पासवर्ड माहित असला तरी तो तुमचे लॉक केलेले WhatsApp चॅट ओपन करू शकणार नाही.

हे सुद्धा वाचा: Amazon GIF Sale मध्ये 20 हजार रुपयांअंतर्गत येणाऱ्या लेटेस्ट 5G स्मार्टफोन्सवर बंपर Discount। Tech News

WhatsApp चॅट लॉक

लॉक केलेल्या चॅट नेहमी चॅट सेक्शनमध्ये टॉपवर असलेल्या ‘Locked Chat’ मध्ये दिसतात. ते उघडण्यासाठी वापरकर्त्यांना फोन पिन किंवा बायोमेट्रिक प्रमाणीकरण वापरावे लागेल. यामुळे आता कंपनी एका गुप्त कोडद्वारे या चॅट्स अनलॉक करण्याची सुविधा देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

WhatsApp सिक्रेट कोड

स्क्रीनशॉटनुसार, चॅट लॉक सेटिंगमधील सिक्रेट कोड बॅनरद्वारे फोनच्या पिनमुळे तुमच्या चॅट्स सीक्रेट कोडने अनलॉक करा असे सांगितले जात आहे. या फीचरचा परिचय अशा लोकांना खूप फायदा होईल ज्यांच्या फोनचा पिन त्यांच्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना माहित आहे.

त्यामुळे, आता पिन कळल्यानंतरही ते त्याच्या लॉक केलेल्या WhatsApp चॅटमध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. हे वैशिष्ट्य भविष्यातील आगामी अपडेट्ससह जारी केले जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, WhatsApp सिक्रेट कोड फीचर अद्याप डेव्हलपमेंट स्टेजवर आहे. हे फिचर लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले जाईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo