Samsung Galaxy Watch 5 आणि Watch 5 pro भारतात लाँच,जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स

Samsung Galaxy Watch 5 आणि Watch 5 pro भारतात लाँच,जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
HIGHLIGHTS

Samsung Galaxy Watch 5 आणि Watch 5 pro लाँच

Samsung Galaxy Watch 5 ची सुरुवातीची किंमत सुमारे 22,100 रुपये

Galaxy Watch 5 Pro ची सुरुवातीची किंमत सुमारे 35,600 रुपये

Samsung ने ग्रेफाइट, पिंक गोल्ड आणि सिल्व्हर या तीन कलर ऑप्शन्समध्ये Samsung Galaxy Watch 5 (40mm) लाँच केली आहे. या स्मार्टवॉचचा ब्लूटूथ व्हेरिएंट $279 म्हणजेच सुमारे 22,100 रुपये आणि LTE व्हेरिएंट  $329 म्हणजेच सुमारे 26,100 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तर Samsung Galaxy Watch 5 (44mm) Graphite, Sphere आणि Silver color options मध्ये लाँच करण्यात आला आहे. या मॉडेलची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही.

हे सुद्धा वाचा : Oppoने लाँच केला 50-इंच 4K स्मार्ट TV, डॉल्बी साउंड तुम्हाला घरबसल्या देईल सिनेमा हॉलची मजा

सॅमसंग गॅलेक्सी वॉच 5 प्रो ब्लॅक टायटॅनियम आणि ग्रे टायटॅनियम या दोन कलरमध्ये लाँच करण्यात आली आहे. या वॉचचा ब्लूटूथ व्हेरिएंट $ 449 म्हणजेच सुमारे 35,600 रुपये आणि LTE व्हेरिएंट $ 499 म्हणजेच सुमारे 39,600 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. दोन्ही वॉच कंपनीच्या अधिकृत साइटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत, ते  26 ऑगस्टपासून खरेदी करता येतील.

Samsung Galaxy Watch 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

या सॅमसंग वॉचमध्ये 1.4-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 450×450 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतो. सोबतच, Galaxy Watch 5 Pro मध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले फिचर उपलब्ध आहे. Samsung Galaxy Watch 5 Pro मध्ये ड्युअल कोर Exynos W920 प्रोसेसर, 1.5 GB RAM आणि 16 GB स्टोरेज आहे.

तसेच, स्मार्टवॉचमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, ब्लूटूथ v5.2, NFC आणि GPS देण्यात आले आहेत. वॉचमध्ये 590mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही वॉच 8 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 8 तासांच्या झोपेचा मागोवा घेऊ शकते. Samsung Galaxy Watch 5 Pro ला पाणी आणि धूळ प्रतिरोधकांसाठी IP68 रेटिंग देखील मिळाले आहे. 

Samsung Galaxy Watch 5 चे स्पेसिफिकेशन 

Samsung Galaxy Watch 5 देखील WearOS 3.5 आधारित One UI Watch 4.5 सह सादर करण्यात आला आहे. या घड्याळाच्या 44mm प्रकारात 1.4-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 450×450 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह येतो. तर 40mm प्रकारात 1.2-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले आणि 396×396 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. ऑलवेज ऑन डिस्प्ले (AOD) सपोर्ट दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy Watch 5 मध्ये ड्युअल कोर Exynos W920 प्रोसेसरसह 16 GB स्टोरेज, Samsung Galaxy Watch 5 Pro प्रमाणे 1.5 GB RAM देखील मिळेल.

Samsung Galaxy Watch 5 देखील कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth v5.2, NFC आणि GPS चे समर्थन करते. Galaxy Watch 5 (44mm) मध्ये 410mAh बॅटरी आहे आणि Galaxy Watch 5 40mm मध्ये 284mAh बॅटरी आहे. दोन्ही व्हेरिएंटमध्ये वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे.दोन्ही व्हेरियंटमध्ये वॉटर आणि डस्ट रेसिस्टंटसाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo