Apple Watch Ultra प्रमाणे लुकसह नवीन Gizmore स्मार्टवॉच लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत

HIGHLIGHTS

Gizmore Vogue स्मार्टवॉच स्वस्तात लाँच

ही वॉच हुबेथूब Apple Watch Ultra सारखी दिसते.

स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि Flipkart वरून खरेदी करता येईल.

Apple Watch Ultra प्रमाणे लुकसह नवीन Gizmore स्मार्टवॉच लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे किंमत

Gizmore ने नवीन स्मार्टवॉच Gizmore Vogue लाँच केले आहे, जे हुबेहुब Apple Watch Ultra सारखे दिसते. हे स्मार्टवॉच 1.95 इंच एचडी डिस्प्लेमध्ये येते, ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 320X38 पिक्सेल आहे. ही वॉच तब्बल 10 दिवसांच्या बॅटरीसह येईल. चला तर जाणून घेऊयात स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : MOTOROLAच्या जबरदस्त टॅबलेटच्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत

किंमत : 

 ही एक सुपर स्टायलिश वॉच आहे. त्याची किंमत 1,999 रुपये आहे. जे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वरून खरेदी करता येईल. तसेच, स्मार्टवॉच गिझमोर वेबसाइटवरून देखील खरेदी करता येईल. ही वॉच ब्लॅक, ऑरेंज आणि व्हाईट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Gizmore Vogue चे स्पेसिफिकेशन्स 

Gizmore Vogue स्मार्टवॉच हलके आणि कंफर्टेबल डिझाइनसह येते. वॉच मेटल केसिंग आणि स्क्वेअर डायलमध्ये येते, जे लुकला प्रीमियम लुक देते. त्याची स्क्रीन टू बॉडी रेशो 91% आहे. यात मोठा एज-टू-एज डिस्प्ले आहे. वॉचमध्ये स्प्लिट स्क्रीन व्ह्यू शॉर्टकट देण्यात आला आहे. यामध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले मिळेल. त्याबरोबरच, या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक वॉच फेस देण्यात आले आहेत. 

Gizmore Vogue हे ऍडव्हान्स ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच आहे. जो ब्लूटूथ 5.1 व्हर्जन सपोर्टसह येतो. त्याच्या मदतीने कॉलिंग सहज करता येते. वॉच Apple सिरी आणि गुगल असिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. डिवाइस IP67 प्रमाणपत्रासह येते. स्मार्टवॉच एका चार्जमध्ये 10 दिवस वापरले जाऊ शकते. हे घड्याळ वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते. त्याच कॉलिंग दरम्यान 2 दिवसांचा बॅटरी बॅकअप दिला जातो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo