boAt वेअरेबल ब्रँड स्वस्तात उत्तम प्रोडक्ट्स देण्यासाठी भारतात लोकप्रिय ब्रँड आहे. कंपनीने आपल्या स्मार्टवॉचच्या यादीत आता नवे स्मार्टवॉच लाँच केले आहे. boAt Storm Connect Plus स्मार्टवॉच यादीत समाविष्ट झाले आहे. ही वॉच बजेटमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंग सुविधा ऑफर करणार आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
boAt Storm Connect Plus किंमत
बोट ब्रँडच्या या स्मार्टवॉचची प्रास्ताविकी किंमत 1,799 रुपये इतकी आहे. ही स्मार्टवॉच कंपनीच्या अधिकृत साइटशिवाय फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ही वॉच डीप ब्लू, ऍक्टिव्ह ब्लॅक, मरून आणि कूल ग्रे कलरमध्ये खरेदी करू शकता.
ही अफोर्डेबल स्मार्टवॉच 2.5D कर्व डिझाइनसह 1.91 इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे. बॅकग्राउंड नॉइज कमी करण्यासाठी कंपनीने यामध्ये ENx अल्गोरिदमचा वापर केला आहे. यामध्ये तुम्हाला 100 पेक्षा जास्त क्लाउड बेस्ड वॉच फेसेस मिळतील. ही वॉच एका चार्जमध्ये सात ते 10 दिवसांपर्यंत टिकेल.
आरोग्यविषयक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग यांसारख्या फीचर्ससाठी सपोर्ट मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी, या वॉचमध्ये तुम्हाला ब्लूटूथ व्हर्जन 5.3, बिल्ट माइक आणि स्पीकरचा सपोर्ट देखील मिळेल. यात म्युझिक कंट्रोल आणि कॅमेरा सपोर्टसारखे फीचर्स मिळतील.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile