IPL 2025 ऑनलाईन पाहण्याची मज्जा अगदी Free! Jio ने आणली महा क्रिकेट ऑफर, ‘या’ युजर्सना मिळेल लाभ 

IPL 2025 ऑनलाईन पाहण्याची मज्जा अगदी Free! Jio ने आणली महा क्रिकेट ऑफर, ‘या’ युजर्सना मिळेल लाभ 
HIGHLIGHTS

रिलायन्स Jio ने त्यांच्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली.

22 मार्च 2025 पासून सुरू होणारा IPL 2025 सिझन ऑनलाईन मोफत पहा.

Jio ची ही महा क्रिकेट ऑफर 17 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत लाईव्ह आहे.

क्रिकेट लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. रिलायन्स Jio ने त्यांच्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांसाठी एक खास ऑफर सादर केली आहे. ज्यामुळे ते IPL 2025 च्या संपूर्ण सिझनचा पूर्णपणे मोफत आस्वाद घेण्यास सक्षम असतील. होय, जर तुम्ही 299 रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज केले किंवा नवीन जिओ सिम कनेक्शन घेतले तर, तुम्हाला 90 दिवसांसाठी JioHotstar वर IPL 2025 पाहण्याची सुविधा मोफत मिळेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, 22 मार्च 2025 पासून सुरू होणारा हा रोमांचक क्रिकेट हंगाम तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा टीव्हीवर कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय लाईव्ह पाहू शकता. या ऑफर्ससह हा कंटेंट तुम्ही 4K कॉलिटीमध्ये पाहण्यास सक्षम असाल.

299 रुपयांपेक्षा Jio प्लॅनवर मिळेल ऑफर

महत्त्वाचे लक्षात घ्या की, Jio ने स्पष्ट केले आहे की, ही ऑफर फक्त 299 रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठीच वैध असेल. जर एखाद्या नवीन वापरकर्त्याने Jio सिम घेतला तर त्याला IPL 2025 च्या मोफत ऑनलाइन स्ट्रीमिंगचा लाभ घेण्यासाठी किमान 299 रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे.

तसेच, विद्यमान ग्राहकांना देखील ही ऑफर मिळविण्यासाठी किमान 299 रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्ज करणे आवश्यक असेल. एवढेच नाही तर, कंपनी 50 दिवसांपर्यंत JioFiber आणि Jio Airfiber चे मोफत ट्रायल कनेक्शन देखील देत आहे. या ट्रायलसह युजर्सना 800 हून अधिक टीव्ही चॅनेल, 11+ OTT Apps आणि अमर्यादित Wi-Fi चा ऍक्सेस मिळेल.

‘अशा’प्रकारे घ्या ऑफरचा लाभ?

Jio ची ही महा क्रिकेट ऑफर 17 मार्च ते 31 मार्च 2025 पर्यंत लाईव्ह आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, विद्यमान Jio ग्राहकांना किमान 299 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. नवीन जिओ ग्राहकांना 299 किंवा त्याहून अधिक किमतीच्या प्लॅनसह जिओ सिम कनेक्शन घ्यावे लागेल. याव्यतिरिक्त, जर तुम्ही 17 मार्चपूर्वी रिचार्ज केले, तर तुम्ही 100 रुपयांच्या ऍड-ऑन पॅकद्वारे देखील ही ऑफर घेण्यास सक्षम असाल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo