भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio ने काही काळापूर्वी त्यांच्या अनेक प्रीपेड प्लॅनमध्ये JioHotstar मोफत देण्याची घोषणा केली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही ऑफर मार्च 2025 च्या मध्यात आणण्यात आली होती आणि त्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 होती. अर्थात ज्यांनी 31 मार्चपर्यंत रिचार्ज केले त्यांना प्लॅनसह मोफत JioHostar मिळेल. त्यानंतर, कंपनीने या ऑफरची वैधता 15 एप्रिल 2025 पर्यंत वाढवली होती.
आनंदाची बातमी म्हणजे आता पुन्हा एकदा कंपनीने त्यांच्या मोफत JioHostar ऑफरच्या मुदतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. वापरकर्ते रिचार्ज करूनही JioHotstar मोफत मिळवू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात या Jio ऑफरची नवी मुदत-
JioHotstar Free ऑफर
Jio ने प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनसह मोफत JioHotstar ऑफर 30 एप्रिल 2025 पर्यंत वाढवली आहे. महत्त्वाचे लक्षात घ्या की, ही ऑफर फक्त 299 रुपये आणि त्यावरील प्लॅनवर उपलब्ध आहे. होय, 299 रुपये आणि त्यावरील किंमतीच्या प्लॅनवर मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन दिले जात आहे, जे दररोज किमान 1.5GB डेटा देतात. त्याचप्रमाणे, कंपनी 299 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या पोस्टपेड प्लॅनवरही समान ऑफर युजर्सना देत आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, रिलायन्स Jio ने वापरकर्त्यांसाठी इंडियन प्रीमियर लीग IPL 2025 मोफत पाहण्यासाठी अमर्यादित ऑफर जाहीर केली होती. IPL 2025 आता JioHotstar प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होत आहे. यासह, आता Jio वापरकर्ते सबस्क्रिप्शनशिवाय IPL पाहण्यास सक्षम आहेत.
प्लॅनमधील बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, 299 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या प्लॅनसह कंपनी वापरकर्त्यांना दररोज डेटा देत आहे. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत SMS देखील मिळतात. या प्लॅन्सची वैधता वेगवेगळी असते. मात्र, महत्त्वाचे लक्षात घ्या की, अनेक प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील दिला जातो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile