AIRTELच्या पाच प्लॅन्समधून हॉटस्टार सबस्क्रिप्शन हटवले.
परंतु अजुनही काही प्लॅन्समध्ये Disney + Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
रिलायन्स JIO ने काही दिवसांपूर्वी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन त्यांच्या अनेक लोकप्रिय प्लॅनमधून काढून टाकले आहे आणि आता Airtel ने देखील तेच केले आहे. एअरटेलने एकाच वेळी पाच रिचार्ज प्लॅनमधून Disney + Hotstar सबस्क्रिप्शन काढून टाकले आहे. मात्र, कंपनीकडे डिजनी + हॉटस्टारसह प्लॅन्स उरले नाहीत, असे नाही. एअरटेलकडे अजूनही काही प्लॅन्स आहेत, ज्यात Disney + Hotstar सदस्यता उपलब्ध आहे.
या प्लॅन्समध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार नाही.
Airtel पूर्वी आपल्या वापरकर्त्यांना रु. 181, रु. 399, रु. 599, रु. 839 आणि रु. 2999 च्या रिचार्ज प्लॅनसह मोफत Disney + Hotstar सबस्क्रिप्शन देत असे, परंतु आता हे प्लॅन्स अपडेट केले गेले आहेत. हे प्लॅन एअरटेलच्या वेबसाइटवर आहेत, परंतु Disney + Hotstar सदस्यता यात नाही.
Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स
तुम्हाला अजूनही Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत हवे असल्यास तुम्ही 499 रुपयांचा रिचार्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.
याशिवाय, डिजनी + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 3,359 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह देखील उपलब्ध आहे. हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन या प्लॅनसह एक वर्षासाठी उपलब्ध असेल. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची आहे. यासोबतच अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि दररोज 2 GB डेटा मिळतो.
Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.