JIO नंतर AIRTEL ने दिला झटका ! ‘या’ 5 प्लॅन्सचे OTT बेनिफिट्स झाले कमी, बघा डिटेल्स…

JIO नंतर AIRTEL ने दिला झटका ! ‘या’ 5 प्लॅन्सचे OTT बेनिफिट्स झाले कमी, बघा डिटेल्स…
HIGHLIGHTS

AIRTELने आपले काही प्लॅन्स अपडेट केले आहेत.

AIRTELच्या पाच प्लॅन्समधून हॉटस्टार सबस्क्रिप्शन हटवले.

परंतु अजुनही काही प्लॅन्समध्ये Disney + Hotstar सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

रिलायन्स JIO ने काही दिवसांपूर्वी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन त्यांच्या अनेक लोकप्रिय प्लॅनमधून काढून टाकले आहे आणि आता Airtel ने देखील तेच केले आहे. एअरटेलने एकाच वेळी पाच रिचार्ज प्लॅनमधून Disney + Hotstar सबस्क्रिप्शन काढून टाकले आहे. मात्र, कंपनीकडे डिजनी + हॉटस्टारसह प्लॅन्स उरले नाहीत, असे नाही. एअरटेलकडे अजूनही काही प्लॅन्स आहेत, ज्यात Disney + Hotstar सदस्यता उपलब्ध आहे. 

हे सुद्धा वाचा : नवीन आणि बजेटमध्ये TV खरेदी करायचंय ? Amazonवर मिळतायेत भन्नाट ऑफर, लगेच बघा…

 या प्लॅन्समध्ये Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळणार नाही. 

Airtel पूर्वी आपल्या वापरकर्त्यांना रु. 181, रु. 399, रु. 599, रु. 839 आणि रु. 2999 च्या रिचार्ज प्लॅनसह मोफत Disney + Hotstar  सबस्क्रिप्शन देत असे, परंतु आता हे प्लॅन्स अपडेट केले गेले आहेत. हे प्लॅन एअरटेलच्या वेबसाइटवर आहेत, परंतु Disney + Hotstar सदस्यता यात नाही.

 Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह प्लॅन्स  

तुम्हाला अजूनही Disney + Hotstar सबस्क्रिप्शन मोफत हवे असल्यास तुम्ही 499 रुपयांचा रिचार्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे.

याशिवाय, डिजनी + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 3,359 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह देखील उपलब्ध आहे. हॉटस्टारचे  सबस्क्रिप्शन या प्लॅनसह एक वर्षासाठी उपलब्ध असेल. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. यासोबतच अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि दररोज 2 GB डेटा मिळतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo