HIGHLIGHTS
599 रुपयांचा Airtel Platinum Family प्लॅन
कंपनी सर्व एअरटेल पोस्टपेड कनेक्शनला अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे.
प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनेक OTT चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.
Airtel आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी विविध प्रकारचे प्लॅन लाँच करत आहे. जर तुम्ही Airtel चे पोस्टपेड यूजर असाल तर कंपनी तुमच्यासाठी 599 रुपयांचा Platinum Family प्लॅन घेऊन आली आहे. पोस्टपेड वापरकर्ते जे एकापेक्षा जास्त कनेक्शन्स आणि उत्तम बेनिफिट्ससह प्लॅन शोधत आहेत, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम ठरणार आहे. बघुयात बेनिफिट्स –
Surveyप्लॅनमध्ये 9 पर्यंत ऍड-ऑन कनेक्शन समाविष्ट आहेत. हा प्लॅन एका सिंगल प्लॅन अंतर्गत कुटुंब आणि व्यक्तींना जोडून ठेवण्यात नक्कीच मदत करणार आहे.
या प्लॅनमध्ये 105GB मंथली डेटा दिलेला आहे. यामध्ये, प्रायमरी कनेक्शनला 75GB मासिक डेटा मिळतो. याशिवाय, प्रत्येक ऍड-ऑन कनेक्शनला 30GB अतिरिक्त डेटा मिळतो. एवढेच नाही, तर कंपनी सर्व एअरटेल पोस्टपेड कनेक्शनला अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे.
विशेष म्हणजे या पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनेक OTT चे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये 6 महिने Amazon Prime Video आणि 1 वर्षाचे Disney Plus Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला 9 कनेक्शनपर्यंत ऍड-ऑन पर्याय मिळतात. यामध्ये यूजर्ससाठी मोफत आणि सशुल्क असे दोन पर्याय आहेत. प्लॅनअंतर्गत मोफत ऍड-ऑन कनेक्शन समाविष्ट आहे. तर, प्रत्येक पेड ऍड-ऑन कनेक्शनसाठी 299 रुपये स्वतंत्र द्यावे लागतील. सशुल्क ऍड-ऑन प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 30GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि SMS फायदे मिळतात.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile