Xiaomi Holi Sale: होळीला घ्या नवा जबरदस्त फोन! 200MP कॅमेरासह येणाऱ्या फोनवर धमाकेदार Discount
होळीच्या निमित्ताने प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने आकर्षक ऑफर्स आणले.
अनेक महागड्या रेडमी स्मार्टफोन्सवर भारी ऑफर्स मिळत आहेत.
200MP कॅमेरासह येणाऱ्या स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे.
Xiaomi Holi Sale: सध्या सर्वत्र होळीच्या सणाची तयारी सुरु झालेली आहे. होळीच्या निमित्ताने प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi ने आकर्षक ऑफर्स आणले आहेत. या सेलदरम्यान, अनेक महागड्या रेडमी स्मार्टफोन्सवर भारी ऑफर्स मिळत आहेत. ज्यामध्ये नुकत्याच लाँच झालेल्या Redmi Note फोन्सपासून ते गेल्या वर्षीच्या 200MP कॅमेरा असलेल्या Redmi Note 13 Pro पर्यंत विविध स्मार्टफोन्सवर अनेक सवलती मिळत आहेत.
SurveyAlso Read: टॉर्चची काय गरज? अंधारात चमकणाऱ्या Realme फोनवर भारी Discount, पहा जबरदस्त ऑफर
या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही Xiaomi होळी सेलमध्ये उपलब्ध असलेल्या Redmi स्मार्टफोन्सवरील बेस्ट डील्सची यादी तयार केली आहे. पहा यादी-
Redmi Note 13 Pro 5G
Redmi Note 13 Pro 5G फोन 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटसह रेडमी फोन Amazon वर फक्त 18,659 रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांची बँक सूट देखील आहे. तर, Flipkart वर हा व्हेरिएंट 21,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक्सचेंज पर्यायांसह इतर विविध ऑफर देखील उपलब्ध आहेत. या होळी सेलमध्ये तुम्हाला आकर्षक 200MP कॅमेरा असलेला Redmi Note 13 Pro प्रचंड सवलतीसह खरेदी करता येईल. होळी सेल आणि या डील्सबद्दल अधिक माहितीसाठी Xiaomi च्या अधिकृत साईटला भेट द्या.

Redmi Note 14 5G
Redmi Note 14 5G फोन कंपनीने अलिडकेच भारतात लाँच केला आहे. होळी सेलदरम्यान तुम्ही कमी किमतीत Redmi सिरीजमधील हे नवीनतम मॉडेल खरेदी करण्यास सक्षम असाल. या फोनची मूळ किंमत 18,999 रुपये इतकी आहे. तर, फोनचा 6GB + 128GB व्हेरिएंट आता फक्त 17,999 रुपयांमध्ये खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास 1000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह तुम्हाला हा फोन आणखी कमी किमतीत खरेदी करता येईल. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या खरेदीवर एक्सचेंज ऑफर आणि इतर सवलतींचा लाभ घेण्यास सक्षम असाल.
Redmi Note 13C 4G
Redmi Note 13C 4G हा या यादीतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. बजेट-फ्रेंडली डिव्हाइस शोधात असणाऱ्या ग्राहकांसाठी रेडमीने हा एक उत्तम पर्याय सादर केला आहे. सध्या Redmi Note 13C 4G ची किंमत 7,999 रुपये इतकी आहे. लक्षात घ्या की, हा फोन होळीसाठी 500 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. लक्षात घ्या की, या स्वस्त स्मार्टफोनमध्येही तुम्हाला पॉवरफुल कॅमेरा मिळतो. तुम्हाला 8000 रुपयांअंतर्गत 50MP चा मुख्य सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile