Upcoming Smartphones this Week: आगामी Nothing Phone 2a पासून तर Realme 12+ 5G पर्यंत ‘हे’ Powerful फोन भारतात होणार लाँच
या आठवड्यात Samsung, Nothing, Realme आणि Xiaomi ब्रँड्सचे प्रीमियम स्मार्टफोन भारतात लाँच होणार
Nothing Phone 2a भारतात उद्या 5 मार्च रोजी लाँच होणार आहे.
Xiaomi 14 फोन भारतात 7 मार्च रोजी लॉन्च होईल.
टेक विश्वात अनेक प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपन्या आपले आगामी स्मार्टफोन्स लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, मार्च महिना Smartphones लाँचसाठी समर्पित असणार आहे. या महिन्यात Samsung, Nothing, Realme आणि Xiaomi ब्रँड्सचे प्रीमियम स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहेत. या स्मार्टफोन्ससह तुम्हाला अनेक नवनवीन फीचर्स आणि टेक्नॉलॉजीची ओळख होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या आठवड्यात लाँच होणाऱ्या आगामी स्मार्टफोन्सची बघुयात यादी-
SurveySamsung Galaxy F15

Samsung Galaxy F15 फोन आज 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता भारतात लाँच केला जाईल. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट फोन असेल, ज्यामध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी असेल. मिळालेल्या माहितीनुसार, प्रोसेसर म्हणून MediaTek Dimension 6100+ चिपसेट दिसेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये LED फ्लॅशसह तीन कॅमेरे असतील. यामध्ये 50MP मेन लेन्ससह 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो शूटरचा समावेश आहे.
Nothing Phone 2a

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Nothing Phone 2a भारतात उद्या 5 मार्च रोजी लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नथिंग ब्रँडचा हा तिसरा फोन असणार आहे. फोनचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे. फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, यात आयकॉनिक ट्रान्सपरंट डिझाइन आणि मागील बाजूस ग्लिफ लाइटिंग आहे.
Lava Blaze Curve 5G

Lava Blaze Curve 5G फोन भारतात 5 मार्च रोजी दुपारी 12 वाजता लॉन्च होईल. हा फोन Amazon India वरून खरेदीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. देशी कंपनी हा स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये सादर करणार आहे. मिड-रेंजरमध्ये सेंटर अलाइन्डपंच-होल कटआउटसह कर्व डिस्प्ले मिळेल. तर, फोनच्या उजव्या बाजूला व्हॉल्यूम आणि पॉवर बटन्स असणे अपेक्षित आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, असे देखील टीझर सूचित करतो.
Realme 12 Plus 5G

Realme 12 Plus फोन भारतात 6 मार्च रोजी लाँच केला जाईल. ही Realme 12 सिरीजची नवीनतम आवृत्ती आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7050 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. Realme 12+ 5G सिरीज जागतिक बाजारात आधीच लाँच झाली आहे. या सिरीजअंतर्गत Realme 12+ 5G आणि Realme 12 Pro+ 5G असे दोन फोन सादर केले गेले आहेत.
Xiaomi 14

Xiaomi 14 फोन भारतात 7 मार्च रोजी लॉन्च होईल. भारतापूर्वी जागतिक बाजारपेठेत ते सादर करण्यात आले आहे. नवीनतम स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर ग्लोबल प्रकारात प्रदान करण्यात आला आहे. कंपनीने यात क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, जो DSLR शी स्पर्धा करतो. तसेच, हा ब्रँड कॅमेराप्रेमींसाठी फोटोग्राफी किटही ऑफर करतो.
Vivo V30 Series

Vivo V30 सिरीज भारतात 7 मार्च रोजी लाँच करण्यात येईल. या सिरीजमध्ये Vivo V30 आणि Vivo V30 Pro हे दोन फोन सादर केले जाऊ शकतात. त्याबरोबरच, ZEISS ब्रँडेड कॅमेरा सेटअप फोनमध्ये उपलब्ध असेल. फोनची किंमत अलीकडेच ऑनलाइन लीक झाली आहे. तसेच, नवीन Vivo फोनमध्ये तब्बल 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. सेल्फीच्या शौकीन लोकांसाठी हे फिचर अप्रतिम ठरणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile