Samsung Galaxy S25 Edge लाँच डेटची घोषणा! लेटेस्ट फोन 200MP कॅमेरासह धमाकेदार एंट्रीसाठी सज्ज 

HIGHLIGHTS

Samsung Galaxy S25 Edge च्या लाँचिंगची तारीख जाहीर

Samsung Galaxy S25 Edge फोन येत्या 13 मे 2025 रोजी जागतिक स्तरावर लाँच केला जाईल.

Samsung Galaxy S25 Edge ची किंमत आणि इतर सर्व तपशील लीक

Samsung Galaxy S25 Edge लाँच डेटची घोषणा! लेटेस्ट फोन 200MP कॅमेरासह धमाकेदार एंट्रीसाठी सज्ज 

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने अखेर त्यांच्या बहुचर्चित स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge च्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या फोनच्या लाँचची चर्चा सुरु होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा कंपनीचा सर्वात स्लिम स्मार्टफोन आहे. हा फोन पुढील आठवड्यात जागतिक बाजारात लाँच होणार आहे. लक्षात घ्या की, या फोन लाँच झाल्यावर शाओमी, विवो सारख्या कंपन्यांच्या मोबाईल फोनला जोरदार स्पर्धा मिळणार आहे.

Also Read: त्वरा करा! Amazon Great Summer Sale चा शेवटचा दिवस! मिड-रेंज स्मार्टफोनवर जबरदस्त Discount

Samsung Galaxy S25 Edge लाँच

Samsung ने आपल्या अधिकृत X हॅन्डलवरून माहिती दिली आहे की, Samsung Galaxy S25 Edge फोन येत्या 13 मे 2025 रोजी जागतिक स्तरावर लाँच केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, उत्तम फोटो काढण्यासाठी या हँडसेटमध्ये 200 मेगापिक्सेल कॅमेरा असेल. कंपनीचा आतापर्यंतचा हा सर्वात स्लिम फोन असेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

लीकनुसार, Samsung ने अद्याप Samsung Galaxy S25 Edge च्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु लीक झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, फोनची किंमत सुमारे 1249 युरो म्हणजेच सुमारे 1,17,680 रुपये असू शकते. हा फोन ग्राहकांना टायटॅनियम जेट ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम आइसी ब्लू कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असेल.

Samsung Galaxy S25 Edge चे अपेक्षित तपशील

लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार आगामी Samsung Galaxy S25 मध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले असू शकतो. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका असेल. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात Qualcomm चा Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB पर्यंत RAM असू शकते, तसेच यात 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

पॉवर बॅकअपसाठी, या स्मार्टफोनमध्ये 3900mAh बॅटरी मिळू शकते, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्याबरोबरच, कनेक्टिव्हिटीसाठी या हँडसेटमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, सिम कार्ड स्लॉट, ई-सिम आणि SUB टाइप-C पोर्ट सारख्या फीचर्ससह प्रदान केले जाऊ शकते. महत्त्वाचे लक्षात घ्या की, फोनची योग्य किंमत आणि सर्व तपशील फोन लाँच झाल्यानंतरच पुढे येतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo