Samsung Galaxy S25 5G वर मिळतोय तब्बल 7000 रुपयांचा Discount, ही ऑफर पुन्हा मिळणार नाही
जानेवारी महिन्यात लेटेस्ट Samsung Galaxy S25 5G सिरीज लाँच
Samsung Galaxy S25 5G फोन प्रचंड सवलतीसह उपलब्ध
Samsung Galaxy S25 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध
साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने अलीकडेच जानेवारी महिन्यात आपली लेटेस्ट Samsung Galaxy S25 5G सादर केली होती. सध्या Samsung आपल्या फ्लॅगशिप फोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर देत आहे. होय, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon वरून तुम्हाला हा फोन प्रचंड सवलतीसह खरेदी करता येणार आहे. यासह तुमची हजारो रुपयांची बचत होईल. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy S25 5G ची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-
Also Read: 50MP कॅमेरासह Samsung Galaxy F56 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy S25 5G ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy S25 5G फोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट सध्या Amazon वरून 80,999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास या फोनवर 7000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे. एवढेच नाही तर, या फोनवर सहज खरेदीसाठी EMI देखील देण्यात आला आहे. तसेच, जुना फोन एक्सचेंजसाठी असल्यास तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळेल. येथून खरेदी करा
Samsung Galaxy S25 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Samsung Galaxy S25 5G फोनमध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2340 x 1080 पिक्सेल आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. सुरळीत कामकाज, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसरद्वारे सुसज्ज करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतो. तसेच, या फोनमध्ये अॅड्रेनो 830 GPU देण्यात आला आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 12GB रॅम आहे. तसेच, यात 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्याय देखील उपलब्ध आहेत.
याव्यतिरिक्त, Samsung Galaxy S25 5G फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 50MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. यासोबतच, 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 10MP चा टेलिफोटो सेन्सर आहे. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 4000mAh बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत. प्रोडक्ट्सच्या किमती आणि ऑफर्स जवळपास बदलत राहण्याची शक्यता आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile