50MP कॅमेरासह Samsung Galaxy F56 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 

50MP कॅमेरासह Samsung Galaxy F56 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 
HIGHLIGHTS

Samsung ने Samsung Galaxy F56 5G फोन भारतात लाँच केला.

Samsung Galaxy F56 5G ला F सीरीजमधील सर्वात स्लिम फोन म्हटले गेले आहे.

Samsung Galaxy F56 5G वर बँक कार्डद्वारे यावर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे.

साऊथ कोरियाची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Samsung ने Samsung Galaxy F56 5G फोन भारतात लाँच केला आहे. हा कंपनीच्या F सिरीजमधील एक स्लिम डिव्हाइस आहे. फीचर्स आणि स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. परफॉर्मन्ससाठी, हा फोन Exynos 1480 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये OIS सपोर्टसह 50MP चा प्राथमिक कॅमेरा येतो. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy F56 5G फोनची किंमत, ऑफर्स आणि सर्व तपशील-

Also Read: Samsung Galaxy S25 Edge लाँच डेटची घोषणा! लेटेस्ट फोन 200MP कॅमेरासह धमाकेदार एंट्रीसाठी सज्ज

Samsung Galaxy F56 5G ची किंमत

Samsung कंपनीने Samsung Galaxy F56 5G फोनचा 8GB+ 128GB व्हेरिएंट 25,999 रुपयांना लाँच केला आहे. त्याबरोबरच, फोनचा दुसरा व्हेरिएंट 8GB रॅम+ 256GB आहे, ज्याची किंमत 28,999 रुपये आहे. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, बँक कार्डद्वारे फोनवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, फोनमध्ये ग्रीन आणि व्हायलेट असे दोन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

samsung galaxy f56 new slim 5g phone launched

Samsung Galaxy F56 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy F56 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ सुपर AMOLED+ डिस्प्ले देण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्लस प्रोटेक्शन देखील आहे. उत्तम परफॉर्मन्स, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या फोनमध्ये Exynos 1480 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे.

फोनमधील इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सुरक्षेसाठी या फोनमध्ये नॉक्स व्हॉल्ट फीचर देखील आहे. यासोबतच, तुम्हाला सॅमसंग वॉलेटसह टॅप अँड पे फीचर देखील मिळेल. याला एफ सीरीजमधील सर्वात स्लिम फोन म्हटले गेले आहे.

याव्यतिरिक्त, फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F56 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेटअप आहे, जो OIS सपोर्टसह आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo