बहुप्रतीक्षित Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन अखेर टेक विश्वात लाँच, फोटोग्राफीसाठी मिळेल DSLR कॅमेराची पॉवर। TECH NEWS 

बहुप्रतीक्षित Xiaomi 14 Ultra स्मार्टफोन अखेर टेक विश्वात लाँच, फोटोग्राफीसाठी मिळेल DSLR कॅमेराची पॉवर। TECH NEWS 
HIGHLIGHTS

Xiaomi 14 Ultra देशांतर्गत बाजारपेठेत चीनमध्ये लाँच केला गेला आहे.

मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2024 इव्हेंटमध्ये हा फोन जागतिक स्तरावर आणले जाईल

कंपनीने वापरकर्त्यांना DSLR कॅमेराची पॉवर देण्यासाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

Xiaomi ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 14 Ultra देशांतर्गत बाजारपेठेत चीनमध्ये लाँच केला आहे. 25 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2024 इव्हेंटमध्ये हे जागतिक स्तरावर आणले जाईल, असे म्हटले जात आहे. डिवाइसची विशेषता म्हणजे कंपनीने यात क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे, जो DSLR शी स्पर्धा करतो. यासोबतच हा ब्रँड कॅमेराप्रेमींसाठी फोटोग्राफी किटही ऑफर करतो. चला तर मग जाणून घेऊयात नवीनतम Xiaomi 14 Ultra ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स- 

हे सुद्धा वाचा: Limited Time Deal! लेटेस्ट Realme 12 Pro+ 5G वर मिळतोय प्रचंड Discount, ‘या’ सेलमधून करा ऑर्डर

Xiaomi 14 Ultra ची किंमत

Xiaomi 14 Ultra चीनमध्ये तीन मेमरी प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. डिव्हाइसच्या 12 GB + 256 GB स्टोरेजची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 75,000 रुपये आहे. फोनच्या 16 GB + 512 GB स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 6,999, अंदाजे 82,000 रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडेल 16GB RAM + 1TB स्टोरेजची किंमत CNY 7,799 म्हणजेच भारतीय किंमतीनुसार 91,500 रुपये आहे. मोबाइलसाठी, वापरकर्त्यांना ब्लु, ब्लॅक आणि व्हाईट असे तीन कलर ऑप्शन्स मिळतील.

Xiaomi 14 Ultra alternatives in india
Xiaomi 14 Ultra

Xiaomi 14 Ultra कॅमेरा 

फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना DSLR कॅमेराची पॉवर देण्यासाठी क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 50MP LYT-900 प्राथमिक कॅमेरा आहे. हा सेकंड जनरेशन 1 इंच कॅमेरा सेन्सर आहे. त्याबरोबरच, डिव्हाइस f/1.8 अपर्चर आणि ADL अल्ट्रा-लो रिफ्लेक्शन कोटिंगसह 50MP अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरासह सुसज्ज आहे. तसेच, फोनच्या टेलीफोटो लेन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 50MP चा IMX858 कॅमेरा सेंसर आहे. 

त्याबरोबरच, 5x ऑप्टिकल झूमसह 50MP Sony IMX858 पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आहे. इतकेच नाही तर, उत्कृष्ट झूमसाठी ULTRA SNAP, ULTRA RAW आणि ULTRA ZOOM हे फीचर्सही कॅमेरामध्ये उपलब्ध आहेत. ब्रँडने Xiaomi 14 Ultra मध्ये उत्कृष्ट 32-मेगापिक्सेल कॅमेरा लेन्स दिला आहे. सेल्फीचे शौकीन असलेल्या युजर्ससाठी हा कॅमेरा उत्तम आहे. 

xiaomi 14 ultra
#Xiaomi 14

Xiaomi 14 Ultra चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

Xiaomi 14 Ultra मध्ये, वापरकर्त्यांना 6.73 इंच लांबीचा LTPO AMOLED पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. डॉल्बी व्हिजन आणि HDR10+ सपोर्टला सपोर्ट करते. परफॉर्मन्ससाठी ब्रँडने आजपर्यंत क्वालकॉमचा सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चिपसेट स्थापित केला आहे. या प्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे फोन काही मिनिटांतच पूर्ण चार्ज होईल. कंपनीने फोन नवीनतम Android 14 आधारित HyperOS वर आधारित आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo