Limited Time Deal! लेटेस्ट Realme 12 Pro+ 5G वर मिळतोय प्रचंड Discount, ‘या’ सेलमधून करा ऑर्डर

Limited Time Deal! लेटेस्ट Realme 12 Pro+ 5G वर मिळतोय प्रचंड Discount, ‘या’ सेलमधून करा ऑर्डर
HIGHLIGHTS

Realme 12 Pro+ 5G अलीकडेच जानेवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आला.

ऑफरअंतर्गत मोबाईलवर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

ही सवलत एका आठवड्यासाठी म्हणजेच 7 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे.

Realme चा Realme 12 Pro+ 5G अलीकडेच जानेवारी 2024 मध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र, Realme 12 Pro+ 5G वर एका महिन्याच्या आतच प्रचंड डिस्काउंट ऑफर केले जात आहे. या डिस्काउंट ऑफरअंतर्गत हा मोबाईल 2,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. हा स्मार्टफोन मिड-बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे.

Realme 12 Pro+ 5G ची किंमत

Realme 12 Pro+ 5G फोन भारतात तीन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला होता. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 128GB स्टोरेज आहे, ज्याची किमंत 29,999 रुपये आहे. तसेच, 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपये आहे. तर, टॉप व्हेरिएंट 12GB RAM + 256GB ची किंमत 33,999 रुपये आहे. हा फोन सबमरिनर ब्लू, नेव्हिगेटर बेज आणि एक्सप्लोरर रेड कलर ऑप्शन्समध्ये मिळेल.

Realme 12 Pro+ 5G
Realme 12 Pro+ 5G

Realme 12 Pro+ 5G वरील ऑफर्स

Realme 12 Pro Plus 5G वर ही ऑफर फक्त फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटवर जारी करण्यात आली आहे. ऑफरअंतर्गत मोबाईलवर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ही सवलत एका आठवड्यासाठी म्हणजेच 7 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. जी 23 फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि 29 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. या कालावधीत, हे Realme 12 Pro+ 5G मॉडेल, ज्याची किंमत 31,999 रुपये आहे, 29,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असेल. या ऑफरसाठी तुम्ही Realme च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

Realme 12 Pro+ 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Realme 12 Pro Plus 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल HD+ स्क्रीन आहे. हा एक कर्व एज डिस्प्ले आहे, जो OLED पॅनेलवर बनवला आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटवर काम करतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हा फोन 12GB डायनॅमिक रॅम टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ही टेक्नॉलॉजी 8GB फिजिकल रॅमसोबत 20GB पर्यंत वाढवते आणि 12GB फिजिकल रॅम 24GB पर्यंत वाढवते.

फोटोग्राफीसाठी फोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर, 50MP चा मुख्य सेन्सर, 64MP पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. 120X झूम आणि OIS टेक्नॉलॉजीसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, जो Sony IMX615 सेन्सर आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे. ही मोठी बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी, मोबाईलमध्ये 67W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आहे. केवळ 19 मिनिटांत 50% आणि 48 मिनिटांत पूर्ण 100% बॅटरी चार्ज करू शकते, असा कंपनीचा दावा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo