अनेक AI फीचर्ससह Moto Razr 50 Ultra 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि आकर्षक ऑफर्स
Moto Razr 50 Ultra 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच
Moto Razr 50 Ultra 5G हा हँडसेट 10 जुलैपासून प्री-बुक करता येईल.
Moto Razr 50 Ultra 5G फोन अनेक Moto AI स्मार्टफोनसह सुसज्ज आहे.
Moto Razr 50 Ultra 5G: लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Moto Razr 50 Ultra 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर आज हा Moto Razr 50 Ultra 5G स्मार्टफोन कंपनीने लाँच केला आहे. गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला होता. त्यानंतर, आता हा स्टायलिश फ्लिप फोन भारतीय बाजारात देखील दाखल झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये Clamshell डिझाइन देण्यात आले आहे. हा फोन अनेक Moto AI स्मार्टफोनसह सुसज्ज आहे. चला तर मग जाणून घेऊयात Moto Razr 50 Ultra 5G ची किंमत आणि स्पेक्स-
SurveyAlso Read: देशी कंपनी Lava चा आगामी स्मार्टफोन ‘या’ दिवशी भारतात होणार लाँच, तुमच्या बजेटमध्ये असेल का किंमत?
Moto Razr 50 Ultra 5G ची किंमत
#MotorolaRazr50Ultra is here if you want to #FlipTheScript with #motoAI in your hand.
— Motorola India (@motorolaindia) July 4, 2024
Launched at special offer of ₹89,999* incl. all offers. Get #MotoBudsPlus worth ₹9,999 free.
Pre-book on 10 Jul @amazonIN, https://t.co/azcEfy2uaW & leading stores.#IntelligenceInsideAndOut pic.twitter.com/fOImuTomig
Moto Razr 50 Ultra 5G स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत फोनचा 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 9,999 रुपये किमतीचे Moto Buds Plus मोफत मिळतील. हा हँडसेट 10 जुलैपासून प्री-बुक करता येईल.
Moto Razr 50 Ultra 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Moto Razr 50 Ultra 5G मध्ये 6.9-इंच लांबीचा इनर poOLED डिस्प्ले आहे. तर, त्याच्या कव्हर स्क्रीनचा आकार 4 इंच लांबीचा आहे. या दोन्ही स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, सुरक्षेसाठी या डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देखील देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी, या डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये तुम्हाला 50MP प्रायमरी सेन्सर इमेज ऑप्टिकल स्टॅबिलायझेशनसह मिळेल. तसेच, यात 50MP टेलिफोटो लेन्स देखील आहे. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी या हँडसेटमध्ये 32MP कॅमेरा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Photomoji, Magic Canvas, Style Sync, Action Shot, Adaptive Stabilization, Horizontal lock इ. AI फीचर्सच्या सपोर्टसह सज्ज आहे.

बॅटरी सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. यासह 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असेल आणि 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट आहे. फोनमध्ये उपलब्ध इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile