HIGHLIGHTS
Itel S23 Amazon वर 14 जून 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध
भारतात Itel S23 स्मार्टफोन 8,799 रुपयांच्या किंमतीत लाँच केला आहे.
हा स्मार्टफोन Octa Core Unisoc T606 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
नुकतेच Itel S23 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे, जो 9,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा फोन Amazon वर 14 जून 2023 पासून विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घ्या किमंत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स –
Surveyकंपनीने भारतात Itel S23 स्मार्टफोन 8,799 रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन स्टाररी ब्लॅक आणि मिस्ट्री व्हाईट या दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी क्लिक करा
बजेट रेंजमध्ये येणाऱ्या कंपनीच्या लेटेस्ट फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन Octa Core Unisoc T606 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यासह 4GB आणि 4GB म्हणजेच 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळेल. हे स्टोरेज मायक्रो SD कार्डद्वारे 256GB पर्यंत वाढवण्याजोगे आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, Itel S23 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. त्याबरोबरच,सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile