Realme आज भारतात घालणार धुमाकूळ ! Realme Pad X, Watch 3 आणि Earbuds यासह अनेक प्रोडक्ट्स होणार लाँच

Realme आज भारतात घालणार धुमाकूळ ! Realme Pad X, Watch 3 आणि Earbuds यासह अनेक प्रोडक्ट्स होणार लाँच
HIGHLIGHTS

Realme चा टेकलाइफ इव्हेंट आज भारतात होणार

दुपारी 12:30 वाजता Realme च्या सोशल मीडिया अकाउंटवर डायरेक्ट स्ट्रीम होणार

इव्हेंटदरम्यान, Realme Pad X लाँच होणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme आज भारतात अनेक नवीन प्रोडक्ट्स लाँच करण्याच्या तयारीत आहे. लॉन्च इव्हेंट 26 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता सुरू होणार आहे, जो Realme च्या सोशल मीडिया अकाउंटवर डायरेक्ट स्ट्रीम केला जाईल. या इव्हेंटमध्ये सर्वात डिमांडिंग प्रोडक्ट्स म्हणजे Realme Pad X देखील लाँच होणार आहे. या लेखात आम्ही तुम्हाला प्रोडक्ट्सची यादी सांगणार ​​आहोत, जी कंपनी तिच्या टेकलाइफ इव्हेंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे… 

हे सुद्धा वाचा : Sony ची नवीन स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच, अल्ट्रा HD डिस्प्लेसह तुमच्या घराला बनवा थिएटर

Realme Pad X

Realme Pad X मध्ये 11-इंच लांबीचा 2K LCD डिस्प्ले आहे. हे क्वाड-स्पीकर सेटअपसह सुसज्ज आहे. टॅबलेट स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटद्वारे समर्थित आहे आणि 6GB रॅमसह 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. पॅड X मध्ये 5 GB  व्हर्च्युअल रॅम देखील आहे. हे उपकरण डॉल्बी ऍटमॉस आणि हाय-रेस ऑडिओला सपोर्ट करेल. पॅड X मध्ये 8500mAh बॅटरी देखील आहे. चीनमध्ये पॅड X आधीच लाँच करण्यात आला आहे.

realme pad x

Realme Watch 3 

Realme Watch 3 कंपनीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. रेंडर इमेज दर्शविते की, त्यात एक मोठी स्क्रीन असेल, उजव्या काठावर एक फिजिकल बटनसह मायक्रोफोन असेल. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट असेल. यात एक मोठा AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.

realme Flat monitor 

Realme आज भारतात फ्लॅट मॉनिटर लाँच करणार आहे. ज्यामध्ये 23.8-इंच फुल HD बेझल-लेस डिस्प्ले आहे. मॉनिटर 75Hz रिफ्रेश रेटसह 8ms रिस्पॉन्स टाइम देखील देतो.

Realme Buds Air 3 Neo

आज Realme Buds Air 3 Neo देखील सादर केले जाईल. यात 10mm डायनॅमिक बास ड्रायव्हर, PEEK+ TPU पॉलिमर कंपोझिट डायफ्राम आहे. हे उपकरण डॉल्बी ऍटमॉसला देखील समर्थन देते आणि नॉइज कॅन्सिलेशनची सुविधा आहे.

 realme स्मार्ट कीबोर्ड

Realme मधील स्मार्ट कीबोर्ड 280mAh अल्ट्रा-लार्ज बॅटरीसह सुसज्ज आहे. कीबोर्ड कस्टमाइज टास्क KEY सह येतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo